इंडोनेशिया भूकंप; मृतांचा आकडा १६२ वर; शाळा, हॉस्पिटल्सही कोसळले

इंडोनेशियातल्या जावामध्ये सोमवारी झालेल्या तीव्र भूकंपात १६२ जणांचा मृत्यू झाल्याचा आकडा समोर आला आहे. जमिनीवरच्या राडारोड्याखाली अडकलेल्या नागरिकांचा अद्यापही शोध सुरुच आहे. हा भूकंप जवळपास ५. रिश्टर स्केल इतका तीव्र होता.

    जकार्ता – इंडोनेशियातल्या (Indonesia) जावामध्ये सोमवारी झालेल्या तीव्र भूकंपात (Earthquake) १६२ जणांचा मृत्यू झाल्याचा आकडा समोर आला आहे. जमिनीवरच्या राडारोड्याखाली अडकलेल्या नागरिकांचा अद्यापही शोध सुरुच आहे. हा भूकंप जवळपास ५. रिश्टर स्केल इतका तीव्र होता.

    भूकंपाचा केंद्रबिंदू जावाच्या पश्चिम भागातल्या सिआंजूर (Cianjur) शहराच्या आसपास होता. हे ठिकाण इंडोनेशियाची राजधानी जकार्तापासून (Jakarta) ७५ किलोमीटर अंतरावर आहे. या भागात जवळपास २०-२५ लाखांची लोकवस्ती आहे. या भूकंपामुळे सिआंजूर शहरातल्या अनेक मोठमोठ्या इमारती कोसळल्या (Building Collapse). यामध्ये अनेक शाळा, हॉस्पिटल्स यांचाही समावेश आहे.

    भूकंपामध्ये आतापर्यंत १६२ मृत्यू झाल्याची माहिती हाती येत आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. मृतांमध्ये बहुतांश विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांच्या शाळेचे तास संपल्यानंतर ते जादा तासांसाठी थांबले होते. त्यावेळी हा भूकंप झाला आणि शाळेची इमारत कोसळली. पश्मिच जावाचे गव्हर्नर रिदवान कामिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ हजारांहून अधिक जणांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे.