पाकिस्तान सांख्यिकी ब्युरो (PBS) च्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की महागाईने 70 वर्षांचे रेकॉर्ड मोडीत काढले आहे. तीन वर्षांत अन्नधान्याच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत. पेट्रोल 145.82 आणि डिझेल 142 पाकिस्तानी रुपये प्रति लिटरवर पोहोचले. साखरेचा दर 54 रुपये किलोवरून 150 रुपयांवर पोहोचला आहे.

  पाकिस्तानमध्ये इम्रान सरकारविरोधात सुरू असलेली निदर्शने थांबण्याचे नाव घेत नाहीत. आता शुक्रवारच्या नमाजानंतर बेकायदेशीर महागाईविरोधात देशव्यापी निदर्शने सुरू झाली आहेत. रावळपिंडी, इस्लामाबाद, कराची, पेशावर, क्वेटा, लारकाना, लाहोर, सुक्कूर, मर्दान, जेकोबाबाद आणि इतर अनेक शहरांमध्ये लोकांनी रस्त्यावर उतरून रस्ते अडवले आहेत.

  यापूर्वी संसदेच्या दोन्ही सभागृहात महागाईच्या मुद्द्यावरून आणि प्रतिबंधित इस्लामिक संघटनेला शरण गेल्यामुळे विरोधकांनी इम्रान सरकारला घेरले होते. इम्रान सरकारने कोणत्या आधारावर दहशतवादी संघटनेशी करार केला, असा सवाल करत हा करार सार्वजनिक करण्याची मागणी केली.

  पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या खासदार शेरी रहमान यांनी एका वृत्तसमुहाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, या देशातील जनतेला अंधारात ठेऊन झालेला करार जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. जेव्हा एखादी व्यक्ती सरकार आणि नागरिक यांच्यातील मध्यस्ती म्हणून काम करते तेव्हा हे दर्शवते की सरकारने नैतिकता आणि लोकांचा विश्वास गमावला आहे.

  पाकिस्तानात पेट्रोलपेक्षा साखर महाग

  पाकिस्तानातील पेशावरच्या घाऊक बाजारात साखरेच्या किंमतीत किलोमागे 8 रुपयांनी वाढ झाली आहे. साखर डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणतात की, घाऊक बाजारात साखर 140 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे, तर किरकोळ बाजारात किंमत 145 रुपये प्रति किलोवरून 150 रुपये किलोपर्यंत वाढली आहे.

  पाकिस्तान सांख्यिकी ब्युरो (PBS) च्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की महागाईने 70 वर्षांचे रेकॉर्ड मोडीत काढले आहे. तीन वर्षांत अन्नधान्याच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत. पेट्रोल 145.82 आणि डिझेल 142 पाकिस्तानी रुपये प्रति लिटरवर पोहोचले. साखरेचा दर 54 रुपये किलोवरून 150 रुपयांवर पोहोचला आहे.

  दरम्यान, भारतात सुध्दा याहून वेगळं चित्र नाहीय.