
या व्हिडिओमध्ये त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे. मास्क घातलेले दोन रक्षकही त्याच्या जवळ उभे आहेत. मजीदरेजा कॅमेऱ्यासमोर म्हणाला की, कुणीही कुराण वाचू नये. माझ्या मृत्यूने कोणी दु:खी व्हावे असे मला वाटत नाही. कोणीही कोणत्याही प्रकारची प्रार्थना करू नये. प्रत्येकाने माझा मृत्यू साजरा करावा, गाणी वाजवावी, आनंदी रहावे.
नवी दिल्ली – इराणमध्ये हिजाबला विरोध करणाऱ्या 23 वर्षीय तरुणाला सार्वजनिकरित्या फाशी देण्यात आली. हे प्रकरण 12 डिसेंबरचे आहे. मात्र, आता त्याच्याशी संबंधित एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ तरुणाला फाशी देण्याआधीचा आहे. यामध्ये तो लोकांना ‘माझ्या मृत्यूनंतर कुराण वाचू नका, जल्लोष करा’ असे सांगत असल्याचे दिसून येत आहे.
या व्हिडिओमध्ये त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे. मास्क घातलेले दोन रक्षकही त्याच्या जवळ उभे आहेत. मजीदरेजा कॅमेऱ्यासमोर म्हणाला की, कुणीही कुराण वाचू नये. माझ्या मृत्यूने कोणी दु:खी व्हावे असे मला वाटत नाही. कोणीही कोणत्याही प्रकारची प्रार्थना करू नये. प्रत्येकाने माझा मृत्यू साजरा करावा, गाणी वाजवावी, आनंदी रहावे.
बेल्जियमच्या संसद सदस्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे. माजिदरेजाच्या मृत्यूसाठी त्यांनी शरिया कायद्याला जबाबदार धरले. त्याने लिहिले की, त्याचे शेवटचे शब्द होते. कुराण वाचू नका. दुःखी होऊ नका. उत्सव साजरा करा. शरिया कायद्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी फक्त हक्कांसाठी आवाज उठवला. शरिया कायद्यामध्ये देवाच्या हवाल्याने अनेक कायद्यांसाठी शिक्षेची तरतूद आहे.
इराणच्या तेहरान न्यायालयाने मजीदरेजाला फाशीची शिक्षा सुनावली. निदर्शनांदरम्यान दोन पोलिस अधिकाऱ्यांची हत्या केल्याचा आरोप त्याच्यावर होता. त्याने दोन अधिकार्यांची चाकूने वार करून हत्या केली आणि इतर चार अधिकार्यांवरही हल्ला केल्याचे कोर्टाने सांगितले. माजिदरेजाला 12 डिसेंबरला सार्वजनिक ठिकाणी फाशी देण्यात आली. याच्या चार दिवसांपूर्वी म्हणजे 8 डिसेंबरला 23 वर्षीय मोहसीन शेखरीलाही फाशी देण्यात आली होती. निदर्शनांदरम्यान त्याने पोलिसांवरही हल्ला केला. हे चित्र माजिद्रेजा आणि त्याच्या आईचे आहे.
गेल्या सप्टेंबरपासून इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलन सुरू आहे. हिजाब नीट न घातल्यामुळे पोलिसांनी तरुणीला ताब्यात घेतले होते, तिथेच तिचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर महिलांचे देशभर आंदोलन पेटले आहे. या निदर्शनांमध्ये आतापर्यंत अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. तर मोठ्या संख्येने लोक जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. जगभरातून या आंदोलनाला ‘वुमन लाईफ लिबर्टी’ या बॅनरखाली प्रतिसाद मिळाला. व्यक्तिस्वातंत्र्याच्या मागणीबरोबरच ‘इस्लामिक प्रजासत्ताक बरखास्त करा आणि सर्वोच्च नेते अली खोमेनी यांना पदभ्रष्ट करा’ अशा घोषणा दिल्या गेल्या.