iran schoolgirls poisoning

इराणची न्यूज एजन्सी IRNA नुसार, उप आरोग्य मंत्री युनूस पनाही म्हणाले की, घोम शहरातील शाळांमध्ये विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. काही लोकांना मुलींचं शिक्षण बंद करायचे आहे. मुलींच्या शाळा बंद करायच्या आहेत. हे यावरून स्पष्ट होत आहे

इराणमधल्या (Iran) उपआरोग्यमंत्री युनूस पनाही (Yunus Panahi) यांनी दिलेल्या माहितीमुळे सध्या खळबळ उडाली आहे. मुलींनी शिक्षण घेवू नये म्हणून त्यांना विष दिले जात असल्याचा दावा युनूस पनाही यांनी केला आहे. ते म्हणाले की, नोव्हेंबर 2022 पासून घोम शहरात विषबाधेमुळे (Iran Schoolgirls Poisoning) श्वसनासंदर्भातील आजाराची शेकडो प्रकरणं समोर आली आहेत.

शाळांमधील पिण्याचे पाणी दूषित झाल्याने विद्यार्थिनींना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचं त्यांनी सांगितलं जात आहे. यामध्ये उलट्या होणे, शरीरात तीव्र वेदना आणि मानसिक समस्यांचा समावेश आहे. त्यांची प्रकृती इतकी खालावली की, त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

इराणची न्यूज एजन्सी IRNA नुसार, उप आरोग्य मंत्री युनूस पनाही म्हणाले की, घोम शहरातील शाळांमध्ये विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. काही लोकांना मुलींचं शिक्षण बंद करायचे आहे. मुलींच्या शाळा बंद करायच्या आहेत. हे यावरून स्पष्ट होत आहे.

ते म्हणाले, जे रासायनिक संयुग वापरले जात आहे त्यावर लवकरच उपचार होऊ शकतात. मात्र, विद्यार्थिनींना जाणीवपूर्वक विष दिलं जातंय. या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. सध्या या प्रकरणी कोणालाही अटक झालेली नाही.

लोरेस्तान प्रांताचे डेप्युटी गव्हर्नर माजिद मोनेमी म्हणाले की, बोरुजेर्ड शहरातही असेच प्रकरण समोर आले आहे. 26 फेब्रुवारी रोजी येथे 50 पेक्षा जास्त विद्यार्थिनींना विषबाधा झाली होती. अनेक विद्यार्थिनींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

न्यायालयीन चौकशी होणार
दरम्यान, 14 फेब्रुवारी रोजी आजारी पडलेल्या मुलींच्या पालकांनी सरकारकडे चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर गुप्तचर संस्था आणि शिक्षण मंत्री या प्रकरणाची चौकशी करत आहेत. ज्यांनी विष दिलंय ते लवकरच पकडले जातील. न्यायालयीन चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.

महसा अमिनी यांच्या मृत्यूनंतर 16 सप्टेंबरपासून निदर्शने सुरू झाल्यानंतर विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. प्रत्यक्षात 16 सप्टेंबर रोजी 22 वर्षीय मेहसाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. तिने हिजाब घातला नव्हता. त्यानंतर तिला अटक करण्यात आली. इराणमध्ये मुलींवर निर्बंध आहेत आणि हिजाब घालवण्याबाबत कडक कायदे आहेत.

महसाचा मृत्यू आणि अनिवार्य हिजाबच्या विरोधात अनेक शाळकरी मुली रस्त्यावर उतरल्या. तेव्हापासून विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. सरकार आणि त्यांच्या एजन्सीवर विषप्रयोगाचा आरोप होता. या आरोपानंतर सरकारी अधिकारी म्हणाले होते की, विद्यार्थी आजारी पडले आहेत, असा आमचा दावा आहे. याचे कारण खराब पाणी आहे. पाण्यात बॅक्टेरिया वाढले आणि ते प्यायल्याने विद्यार्थिनी आजारी पडल्या आहेत.