इस्त्राइल आणि पॅलेस्टिनी संघर्ष; क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर गाझामध्ये युद्धविराम लागू

इस्त्राइलच्या सैन्याने गाझावरील हवाई हल्ल्याबाबत म्हटले की, क्षेपणास्त्र हल्ल्याद्वारे गाझामधील पॅलेस्टिनी दहशतवाद्यांच्या ठिकाणांना लक्ष्य केले. गाझा पट्टीवरील इस्लामिक जिहादी संघटनांवर हल्ला केला. इस्त्राइल आणि पॅलेस्टिनी दहशतवाद्यांमधील नव्या संघर्षाची सुरुवात शुक्रवारी इस्त्राइलने केली होती. इस्त्राइलने गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला हमास संघटनेच्या एका वरिष्ठ सदस्याला अटक केली. यानंतर हल्ल्याचा धोका पाहता शुक्रवारी इस्त्राइलने गाझावर एअरस्ट्राईक केला.

    जेरुसलेम : इस्त्राइल आणि पॅलेस्टिनी (Palestine) दहशतवाद्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. यामध्ये एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले (Missile Attack) केले जात आहेत. अखेर तीन दिवसांसाठी युद्धविराम लागू (Cease Fire Applies) करण्यात आला आहे. यामध्ये गाझामधील ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, युद्धविराम लागू झाल्यानंतर गाझामधील (Gaza) इस्लामिक जिहादी संघटनांच्या (Islamic Jihad Organization) ठिकाणांवर हल्ले केल्याचे इस्त्राइल सैन्याने (Israel Army) म्हटले आहे.

    इस्त्राइलच्या सैन्याने गाझावरील हवाई हल्ल्याबाबत म्हटले की, क्षेपणास्त्र हल्ल्याद्वारे गाझामधील पॅलेस्टिनी दहशतवाद्यांच्या ठिकाणांना लक्ष्य केले. गाझा पट्टीवरील इस्लामिक जिहादी संघटनांवर हल्ला केला. इस्त्राइल आणि पॅलेस्टिनी दहशतवाद्यांमधील नव्या संघर्षाची सुरुवात शुक्रवारी इस्त्राइलने केली होती. इस्त्राइलने गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला हमास संघटनेच्या एका वरिष्ठ सदस्याला अटक केली. यानंतर हल्ल्याचा धोका पाहता शुक्रवारी इस्त्राइलने गाझावर एअरस्ट्राईक केला.

    पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, पॅलेस्टिनी इस्लामिक दहशतवादांविरोधात (Palestinian Movement Islamic Jihad) इस्त्राइलने गाझावर एअरस्ट्राईक केला आहे. इस्त्राइलच्या हवाई हल्ल्यात १५ लहान मुले आणि महिलांसह ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात सुमारे ३०० जण जखमी झाले आहेत.