आम्ही सदैव भारतासोबत, ‘या’ देशाच्या भूमिकेमुळे चीन आणि पाकिस्तानला धडकी

हा देश आहे इस्त्रायल. सुरक्षेसंदर्भात जेव्हा जेव्हा भारताला आपली गरज लागेल, तेव्हा तेव्हा आपण पूर्ण क्षमतेने भारतासोबत उभे राहू, असं विधान इस्त्रायलचे राजदूत रॉन मालका यांनी नुकतंच केलंय. भारत आणि इस्त्रायलच्या मैत्रिपूर्ण संबंधांला स्वातंत्र्यकाळापासूनचा इतिहास आहे. गेल्या पन्नास वर्षात दोन्ही देशातील संबंध घनिष्ट होत गेलेत.

भारताचे जगातील अनेक देशांसोबत घनिष्ट संबंध आहेत. मात्र पाकिस्तान किंवा चीनसंदर्भात भाष्य करताना हे देश जपून बोलत असतात. शक्यतो, कुणालाही न दुखावण्याकडे बहुतांश देशांचा कल असतो. एका देशानं मात्र याची तमा न बाळगता जाहीरपणे आपण भारतासोबत असल्याचं सांगितलंय.

हा देश आहे इस्त्रायल. सुरक्षेसंदर्भात जेव्हा जेव्हा भारताला आपली गरज लागेल, तेव्हा तेव्हा आपण पूर्ण क्षमतेने भारतासोबत उभे राहू, असं विधान इस्त्रायलचे राजदूत रॉन मालका यांनी नुकतंच केलंय. भारत आणि इस्त्रायलच्या मैत्रिपूर्ण संबंधांला स्वातंत्र्यकाळापासूनचा इतिहास आहे. गेल्या पन्नास वर्षात दोन्ही देशातील संबंध घनिष्ट होत गेलेत.

अलिकडच्या काळात दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी एकमेकांच्या देशांना भेटी दिल्यानंतर दोन्ही देशांतील व्यापारी संबंधही वाढीस लागल्याचं सांगितलं जातं. इस्त्रायलच्या या वक्तव्यामुळे चीन आणि पाकिस्तानचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून एलएसीवर (actual line of control) तणाव वाढत चाललाय. या पार्श्वभूमीवर इस्त्रायलकडून आलेलं हे वक्तव्य भारताला बळ देणारं आहे.

एकीकडे गेल्या काही महिन्यांमध्ये युएई, मोरोक्को, सुदान यासारख्या देशांनी इराणसोबत संबंध दृढ करायला सुरुवात केलीय. तर दुसरीकडे इस्त्रायलनं भारतासोबतच्या मैत्रीला जागण्याची भाषा केलीय. त्यामुळे पाकिस्तान एकाकी पडत चालल्याचं निरीक्षण आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक व्यक्त करत आहेत. आम्ही कुणाच्या विरोधात नाही, पण भारताच्या बाजूने आहोत, असंही इस्त्रायलच्या राजदूतांनी स्पष्ट केलंय.