.Mask Wearing People in israel

जगातील अनेक देशांमध्ये पसरत असलेल्या डेल्टा व्हायरसचे काही रुग्ण इस्त्रायलमध्येही(Delta Plus Patients In Israel) आढळले आहेत. त्यामुळे इस्त्रायल सरकारने आता सार्वजनिक ठिकाणी (Mask On Public Places) मास्क वापरण्याचे आदेश काढले आहेत.

    जेरूसलेम : कोरोनावर (Corona) सर्वात मात करणारा आणि सगळ्यात आधी मास्कमुक्ती मिळवणाऱ्या इस्त्रायलमध्ये (Israel) पुन्हा एकदा नागरिकांना चेहऱ्यावर मास्क चढवण्याची वेळ आली आहे. जगातील अनेक देशांमध्ये पसरत असलेल्या डेल्टा व्हायरसचे काही रुग्ण इस्त्रायलमध्येही(Delta Plus Patients In Israel) आढळले आहेत. त्यामुळे इस्त्रायल सरकारने आता सार्वजनिक ठिकाणी (Mask On Public Places) मास्क वापरण्याचे आदेश काढले आहेत.

    कोरोनाचा डेल्टा व्हायरस हा सर्वप्रथम भारतात आढळला आणि त्यानंतर तो जगभर पसरला. या व्हायरसचा आता इस्त्रायली नागरिकांना त्रास होत असल्याची प्रतिक्रिया इस्त्रायल सरकारनं दिली आहे. इस्त्रायलमध्ये बहुतांश नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. मात्र लस घेतलेल्या नागरिकांनाही डेल्टा व्हायरसची लागण होत असल्याचं दिसून आल्यामुळे सरकारच्या चिंतेत भर पडली आहे.

    इस्त्रायलमध्ये एकाच दिवसात १०० पेक्षा अधिक कोरोना नागरिक आढळून आले आहेत. ही चिंतेची बाब असून त्यामुळे सर्व सार्वजनिक ठिकाणांवर मास्क वापरणे आता बंधनकारक करण्यात येत असल्याची घोषणा कोरोना टास्क फोर्सचे प्रमुख नचमन ऐश यांनी इस्त्रायलच्या सरकारी रेडिओ केंद्रावरून केली आहे. भारतात आढळून आलेल्या डेल्टा व्हायरसचा परिणाम जगातील इतर देशांवर होईल, असा अंदाज होताच आणि तो खरा ठरल्याचं ऐश यांनी म्हटलं आहे.

    इस्त्रायलमधील कोरोना नियंत्रणात आल्यानंतर गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याची सक्तीदेखील हटवण्यात आली होती. मात्र १८वर्षांखालील नागरिकांचं लसीकरण झालेलं नसल्यामुळे त्यांना डेल्टा व्हेरिअंटचा अधिक धोका असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या वयोगटाचं लसीकरणाही लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी इस्त्रायलमध्ये जोर धरते आहे.

    आंतरराष्ट्रीय प्रवास करून येणाऱ्या नागरिकांमुळे डेल्टा व्हायरस इस्त्रायलमध्ये आल्याचं पंतप्रधान नफ्तालींनी म्हटलंय. इस्त्रायल विमानतळावर यापुढे कोरोना चाचणी आणि विलगीकरण यांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले असून काही देशांतील नागरिकांच्या आगमनावर बंदी घातली जाण्याची शक्यतादेखील व्यक्त केली आहे.