इस्त्राइलचा गाझावर एअरस्ट्राईक; हमासच्या कमांडरसह १० ठार

इस्त्राइलने गाझावर हल्ला केल्यानंतर तणाव आणखी वाढला आहे. इस्त्राइल सीमेच्या ८० किलोमीटर अंतरावरील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच, इतर कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत. इस्त्राइलने या आठवड्याच्या सुरुवातील गाझाच्या जवळील रस्ते बंद करत सीमेवर अतिरिक्त जवान तैनात केले.

    पॅलेस्टाईन : इस्रायलने (Israel) गाझावर (Gaza) एअरस्ट्राईक (Airstrike) केला आहे. या हल्ल्यात हमास अतिरेकी संघटनेच्या (Hamas) कमांडरसह १० जण ठार झाले आहेत. इस्त्राइलने शुक्रवारी गाझावर अनेक हवाई हल्ले केले. पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला पॅलेस्टिनी बंडखोऱ्यांच्या अटकेनंतर तणाव निर्माण झाला. त्यानंतर इस्त्राइलने गाझा पट्टीवर (Gaza Strip) अनेक एअरस्ट्राईक (Israel Air Strike) केले.

    इस्त्राइलने गाझावर हल्ला केल्यानंतर तणाव आणखी वाढला आहे. इस्त्राइल सीमेच्या ८० किलोमीटर अंतरावरील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच, इतर कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत. इस्त्राइलने या आठवड्याच्या सुरुवातील गाझाच्या जवळील रस्ते बंद करत सीमेवर अतिरिक्त जवान तैनात केले. इस्त्राइलने सोमवारी हमास संघटनेच्या एका वरिष्ठ सदस्याला अटक केली. यानंतर इस्त्राइलने गाझावर एअरस्ट्राईक केला.

    गाझानेही डागले क्षेपणास्त्र
    इस्त्राइलने गाझा पट्टीवर हवाई हल्ले केल्यानंतर प्रत्यत्तरादाखल गाझानेही दोन रॉकेट डागले. पण इस्त्राइलने हे रॉकेट पाडले. गाझाने इस्त्राइलच्या मध्य आणि दक्षिण भागात डागलेले दोन क्षेपणास्त्र इस्त्राइलने पाडल्याची माहिती स्थानिक वृत्तवाहिनीने दिली आहे.