चीनची पंढरी घाबरली; हिंद महासागरात भारताशी पंगा घेणे सोपे नाही 

इंडियन, ओशन रिम असोशिएशन (IORA) द्वारा जाहीर केलेल्या माहितीनुसार भारत त्याच्या वैचारिक समानता असणाऱ्या देशाला एकत्र आणत आहे. ज्यामुळे चीनच्या विस्तारवादी प्रयत्नांना तोंडघशी पडावे लागणार आहे.  

बीजिंग. भारताशी विनाकारण शत्रुत्व घेणं हे दिसतं तितके सोपे नाही याचा साक्षात्कार अखेर चीनला झाला असे म्हणायला हरकत नाही. अमेरिकेसह जगातल्या इतरही देशांनी चीनला दूर सारले आहे. अमेरिकेच्या कम्युनिस्ट सरकारलाही आता हे कळून चुकले आहे की, युद्धात भारतासमोर टिकाव लागणे हे दिसते तितके सोपे नाही. एक इंग्रजी वृत्तपत्रात छापलेल्या लेखानुसार हिंद महासागरात भाराच्या वाढत्या दबदब्याला चीन घाबरला असून भारताचे प्रभुत्व त्याने मान्य केले आहे.

या लेखात नमूद करण्यात आले आहे की, एका प्रकारे चीनने आपली हार मान्य केली आहे, कारणहिंद महासागरात भारताला अद्वितीय भौगोलिक लाभ प्राप्त आहेत. सीमावादाच्या तणावात भारताने चीनवर सागरी मार्गाने बनविलेला दबाव हा फलित झाला असे म्हणता येईल.

चीनचे सरकारी मुखपत्र ग्लोबल टाइम्सने प्रकाशित वैश्विक महत्वकांक्षेसाठी भारताची बदलती भूमिका या लेखात भारत त्याच्या मित्र देशाच्या साथीने सागरी सीमेवर दबाव बनवत आहे असे नमूद करण्यात आले आहे. या क्षेत्रात भारताला मिळालेल्या अद्वितीय भौगोलिक लाभाचा भारत फायदा घेत असल्याचेही सांगण्यात आले.

इंडियन, ओशन रिम असोशिएशन (IORA) द्वारा जाहीर केलेल्या माहितीनुसार भारत त्याच्या वैचारिक समानता असणाऱ्या देशाला एकत्र आणत आहे. ज्यामुळे चीनच्या विस्तारवादी प्रयत्नांना तोंडघशी पडावे लागणार आहे.