कोरोनाचा प्रभाव पूर्ण ओसरायला उजाडेल हे साल, बिल गेट्स यांनी वर्तवला अंदाज

पुढच्या वर्षी म्हणजेच २०२२ संपेपर्यंत कोरोनाचा प्रभाव पूर्णपणे ओसरलेला असेल, असा अंदाज मायक्रोसॉफ्टचे को-फाऊंडर बिल गेट्स यांनी व्यक्त केलाय. कोरोना हे जगावर आलेलं अभूतपूर्व संकट होतं, मात्र आता लस उपलब्ध झाल्यामुळे कोरोनाचा प्रभाव ओसरण्याची आशा निर्माण झाल्याचं बिल गेट्स यांनी म्हटलंय. त्यामुळे पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत म्हणजेच २०२२ हे वर्षं संपेपर्यंत आपण सर्वजण कोरोनाच्या प्रभावातून पूर्णतः बाहेर आलेले असू, असा आशावाद गेट्स यांनी व्यक्त केलाय. 

    कोरोनानं सध्या जगभर थैमान घातलंय. विशेषतः जगातील प्रगत देशांमध्ये कोरोनाच्या बळींची संख्या सर्वाधिक आहे. गेल्या वर्षी सुरु झालेला कोरोनाचा प्रभाव कधी ओसरणार, या प्रश्नानं उत्तर आतापर्यंत कुणीच देऊ शकत नव्हतं. मात्र आता लस उपलब्ध झाल्यामुळे कोरोना लवकरच आटोक्यात येईल, असा अंदाज वर्तवण्यात येतोय.

    पुढच्या वर्षी म्हणजेच २०२२ संपेपर्यंत कोरोनाचा प्रभाव पूर्णपणे ओसरलेला असेल, असा अंदाज मायक्रोसॉफ्टचे को-फाऊंडर बिल गेट्स यांनी व्यक्त केलाय. कोरोना हे जगावर आलेलं अभूतपूर्व संकट होतं, मात्र आता लस उपलब्ध झाल्यामुळे कोरोनाचा प्रभाव ओसरण्याची आशा निर्माण झाल्याचं बिल गेट्स यांनी म्हटलंय. त्यामुळे पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत म्हणजेच २०२२ हे वर्षं संपेपर्यंत आपण सर्वजण कोरोनाच्या प्रभावातून पूर्णतः बाहेर आलेले असू, असा आशावाद गेट्स यांनी व्यक्त केलाय.

    कोरोना लसीबाबत भारतानं केलेल्या संशोधनाचंही बिल गेट्स यांनी तोंडभरून कौतुक केलंय. पूर्ण जग जेव्हा कोरोना व्हायरसवर लस शोधण्याचा प्रयत्न करत होतं, तेव्हा भारतानंही त्यात पुढाकार घेतला. भारतात एकाच वेळी दोन लसीं अस्तित्वात आल्या आणि दोन्हीही उत्तम आहेत, असं बिल गेट्स यांनी म्हटलंय.

    कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला असला तरी लस उपलब्ध होऊ लागल्यामुळे आता पुन्हा एकदा उद्योजकतेला नवी चालना मिळेल, अशी आशा बिल गेट्स यांनी व्यक्त केलीय. पुढील वर्षाच्या अखेपर्यंत आपण सर्वजण कोरोनाच्या प्रभावातून पूर्णतः सावरलेले असू आणि नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज होऊ, असं बिल गेट्स यांनी एका मुलाखतीत म्हटलंय.