चीन सरकारला विरोध करणं Jack Maला पडलं भारी, Alibaba ग्रुपला २५.५२ लाख कोटींचा तोटा

एँटी मोनोपोली रेग्यूलेशन या विषयावर मागील वर्षापासून जॅक मा यांच्यासोबत वाद सुरू आहे. मागील वर्षातील ऑक्टोबर महिन्यात जॅक मा यांनी चीनच्या आर्थिक व्यवस्थेवर टीका केली होती. त्यानंतर अलीबाबा ग्रूपचे वाईट दिवस सुरू झाले. जॅक मा स्वत: गायब झाले होते आणि त्यानंतर ते सार्वजनिक ठिकाणी समोर आलेले नाहीयेत. मिळालेल्या माहितीनुसार, ते हाँगकाँगमध्ये राहत असून त्यांनी विदेश दौरा सुद्धा केला आहे.

  चीन सरकारचा विरोध करणं एवढं सोप नाहीये. येथे सरकारचा विरोध केल्यानंतर त्याला मोठी किंमत चुकवावी लागते. याचं एक उदाहरण म्हणून अलीबाबा ग्रूपचे (Alibaba Group) फाऊंडर जॅक मा (Jack Ma) आहेत. मागील वर्षात जेव्हा जॅक मा यांनी सरकारचा विरोध केला होता. तेव्हापासून आतापर्यंत ग्रूपला ३४४ अब्ज डॉलर म्हणजेच (जवळपास २५,५२,५६७ कोटी रूपये) इतक्या मोठ्या नुकसानला समोरे जावे लागले आहे.

  एँटी मोनोपोली रेग्यूलेशन या विषयावर मागील वर्षापासून जॅक मा यांच्यासोबत वाद सुरू आहे. मागील वर्षातील ऑक्टोबर महिन्यात जॅक मा यांनी चीनच्या आर्थिक व्यवस्थेवर टीका केली होती. त्यानंतर अलीबाबा ग्रूपचे वाईट दिवस सुरू झाले. जॅक मा स्वत: गायब झाले होते आणि त्यानंतर ते सार्वजनिक ठिकाणी समोर आलेले नाहीयेत. मिळालेल्या माहितीनुसार, ते हाँगकाँगमध्ये राहत असून त्यांनी विदेश दौरा सुद्धा केला आहे.

  चीनच्या धोरणावर जोरदार टीका

  मागील वर्षातील ऑक्टोबर महिन्यात चीनचे शहर शांघाई मध्ये चीनच्या आर्थिक नियामक आणि सरकारी बँकांबाबत त्यांनी जोरदार टीका केली होती. त्यांनी Basel Accords वर सुद्धा प्रश्न उपस्थित केले होते. बीजिंगने अलीबाबावर अविश्वास दाखवत चौकशीला सुरूवात केली आणि USD 2.8 अब्ज दंड ठोठावण्यात आला.

  चीनच्या सरकारी मीडियाद्वारे जॅक मा यांच्या विरोधात ऑनलाईन दुष्प्रचार सुरू करण्यात आला आहे. त्यांची छवी क्रूर आणि धनलाभ करणारा एक व्यक्तीमधून दाखवली जात होती.

  मार्केटमध्ये मोठी पडझड

  या एका वर्षात, जॅक मा यांच्या नेतृत्वाखालील तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज अलीबाबाच्या बाजार भांडवलात सुमारे ३४४ अब्ज डॉलरची मोठी घट झाली आहे.