जपानच्या राजकन्येने दिला राजघराण्याला नकार, ‘या’ व्यक्तीसोबत केलं लग्न ; काय आहे कारण?

जपानमध्ये कोणत्याही सामान्य व्यक्तींसोबत लग्न केल्यानंतर त्यांच्या राजघराण्यातलं साम्राज्य संपुष्टात येतं. माकोने हे सुद्धा सांगितलं की, जर त्यांना आमच्या लग्नाबाबत काही त्रास झाला असेल तर मी त्यांची माफी मागते.

  जपानची राजकुमारी माकोने आपल्या प्रेमापोटी शाही घराण्याला नकार दिला आहे. त्यांनी केई कोमुरो नावाच्या व्यक्तीसोबत लग्न ठरवलं आहे. तसेच केई कोमुरो हा व्यक्ती माको यांचा बॉयफ्रेंड आहे. या लग्नानंतर माको जपानच्या राजकुमारी राहणार नाहीयेत. जपानमध्ये कोणत्याही सामान्य व्यक्तींसोबत लग्न केल्यानंतर त्यांच्या राजघराण्यातलं साम्राज्य संपुष्टात येतं. माकोने हे सुद्धा सांगितलं की, जर त्यांना आमच्या लग्नाबाबत काही त्रास झाला असेल तर मी त्यांची माफी मागते.

  मिळालेल्या माहितीनुसार, माको आणि कोमुरो यांच्या लग्नाची कागदपत्रं महालातल्या एका अधिकाऱ्याने प्रस्तूत केले आहेत. माको या महिन्याच्या सुरूवातीपासून तनावात होती. त्या आपल्या लग्नाबाबत नकारात्मक गोष्टी आणि विशेषत: कोमुरोला निशाणा बनवल्यामुळे खूप तनावात होत्या. जरी त्यांची तब्येत आता अधिक प्रमाणात सुधरत आहे.

  राजघराण्यातून माकोने घेतला नाही एकही पैसा

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Nikkei Asia (@nikkeiasia)


  माकोने राजघराण्यातून एकही पैसा घेतलेला नाहीये. दुसऱ्या महायुद्धानंतर राजघराण्यातली ती पहिली व्यक्ती आहे. ज्यांनी एका सामान्य नागरिकासोबत लग्न करतांना, एखादी भेटवस्तू म्हणून एकही पैसा राजघराण्यातून घेतलेला नाहीये. या लग्नानंतर कोणत्याही प्रकारच्या मेजवानीचं आयोजन आणि परंपरेनुसार विधी पार पडणार नाहीत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Eugenia Garavani (@eugeniagaravani)

  माको जपानच्या माजी सम्राट अकिहितो यांची नात आहे. त्यांचं वयवर्ष २९ आहे. त्यांनी २०१७ रोजी त्यांचा मित्र कोमुरो यांच्यासोबत साखरपुडा केला होता. कोमुरो एक सामान्य घराण्यातली व्यक्ती आहे. त्याची पार्श्वभूमी खूप सामान्य आहे. कोमुरो अमेरिकेतील एका लॉ कंपनीमध्ये काम करतो. २०१३ मध्ये कोमुरोने माकोला प्रप्रोज केलं होतं. परंतु कोमुरो यांच्या कुटुंबातील वादामुळे हे लग्न चार वर्ष रखडलं होतं. मात्र, कोमुरो आणि माको यांच तब्बल चार वर्षानंतर लग्न झालं आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by ModernRoyalEra (@modernroyalera)