तालिबान्यांकडून दडपशाही सुरुच, महिलांना विद्यापीठात No Entry

इस्लामिक वातावरण तयार होईपर्यंत काबूल विद्यापीठात(Kabul University) यापुढे महिलांना वर्गात जाण्याची किंवा काम करण्याची परवानगी (Woman Not Allowed In University)दिली जाणार नाही, असं तालिबानने(Taliban Rule) नियुक्त केलेल्या कुलपतींनी जाहीर(Kabul University Chancellor Order) केलं आहे.

    इस्लामिक वातावरण तयार होईपर्यंत काबूल विद्यापीठात(Kabul University) यापुढे महिलांना वर्गात जाण्याची किंवा काम करण्याची परवानगी दिली जाणार नाही, असं तालिबानने(Taliban Rule) नियुक्त केलेल्या कुलपतींनी जाहीर(Kabul University Chancellor Order) केलं आहे. “जोपर्यंत सर्वांना खरे इस्लामिक वातावरण उपलब्ध होत नाही, तोपर्यंत महिलांना विद्यापीठांमध्ये येण्याची किंवा काम करण्याची परवानगी दिली जाणार नाही,” असं मोहम्मद अशरफ घैरत यांनी म्हटलं आहे.(Woman Not Allowed In University)

    विद्यापीठासंदर्भातील तालिबानचे हे नवे धोरण ते १९९०मध्येही पाहायला मिळाले होते. त्यावेळी स्त्रियांना केवळ पुरुष नातेवाईकांसह सार्वजनिक ठिकाणी जाण्याची परवानगी होती. या नियमाचं उल्लंघन केल्यास स्त्रियांना मारहाण केली जात असे. तसेच त्यांना शाळेतून काढण्यात येत होतं.

    तालिबानने पीएचडी धारक कुलगुरू मुहम्मद उस्मान बाबूरी यांची हकालपट्टी केल्यानंतर आणि त्यांच्या जागी बीए पदवीधर मोहम्मद अशरफ घैरत यांची नियुक्ती केली आहे. त्यानंतर सहाय्यक प्राध्यापक आणि प्राध्यापकांसह काबुल विद्यापीठाच्या सुमारे ७० शिक्षण कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. काबुलमधील सर्वात मोठ्या विद्यापीठात घैरत यांची कुलगुरू म्हणून नियुक्ती केल्याचा सोशल मीडियावर निषेध केला जात आहे.