इराणमध्ये हिजाबच्या विरोधात महिला; पोलिसांच्या गोळीबारात ५ ठार, २५० अटकेत

पोलिसांनी २२ वर्षीय महसा अमिनी हिला हिजाब नसल्याने ताब्यात घेतले होते. महसा मूळची कुर्दिश होती. कोठडीत असताना ती कोमात गेली आणि १६ सप्टेंबर रोजी तिचा मृत्यू झाला. यानंतर महिलांचा संताप अनावर झाला.

    नवी दिल्ली – इराणमध्ये मॉरल पोलिसिंगचा निषेध करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ५ जणांचा मृत्यू झाला. तर ८० हून अधिक जखमी झाले आहेत. देशाच्या पश्चिम भागात ही निदर्शने सुरू झाली. या भागाला कुर्दिस्तान म्हणतात. येथील लोक अनेक वर्षांपासून वेगळ्या देशाची मागणी करत आहेत.

    पोलिसांनी २२ वर्षीय महसा अमिनी हिला हिजाब नसल्याने ताब्यात घेतले होते. महसा मूळची कुर्दिश होती. कोठडीत असताना ती कोमात गेली आणि १६ सप्टेंबर रोजी तिचा मृत्यू झाला. यानंतर महिलांचा संताप अनावर झाला. कुर्दिस्तानच्या शहरांनंतर राजधानी तेहरानमध्येही निदर्शने झाली आहेत. हिजाब अनिवार्य करण्याऐवजी ऐच्छिक करावा, अशी महिलांची मागणी आहे.

    अयातुल्ला खामेनी हे इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आहेत. देशात लोकशाही व्यवस्था असूनही सर्व महत्त्वाचे निर्णय ते घेतात. आंदोलक त्यांच्या विरोधातही घोषणा देत ​​आहेत. यानंतर पोलिसांनी गोळीबार केला. केवळ कुर्दिस्तानमध्येच नाही तर राजधानी तेहरान आणि देशातील अनेक शहरांमध्ये खामेनी यांच्या विरोधात निदर्शने होत आहेत. महिलांसोबत पुरुषही मोठ्या संख्येने दिसत आहेत.