तालिबानच्या उपमंत्र्यांची यादी जारी; एकाही महिलेचा समावेश नाही

तालिबानने मंगळवारी उपमंत्र्यांची यादी जाहीर केली. यात एकाही महिलेचा समावेश करण्यात आलेला नाही. या महिन्याच्या सुरुवातीला मंत्र्यांच्या निवडीदरम्यान मंत्रिमंडळात एकाही महिलेचा समावेश करण्यात आलेला नव्हता. यासाठी आतंरराष्ट्रीय पातळीवर खूप टीका करण्यात आली होती. तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये एका पत्र परिषदेत ही यादी सादर केली.

    काबुल : तालिबानने मंगळवारी उपमंत्र्यांची यादी जाहीर केली. यात एकाही महिलेचा समावेश करण्यात आलेला नाही. या महिन्याच्या सुरुवातीला मंत्र्यांच्या निवडीदरम्यान मंत्रिमंडळात एकाही महिलेचा समावेश करण्यात आलेला नव्हता. यासाठी आतंरराष्ट्रीय पातळीवर खूप टीका करण्यात आली होती. तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये एका पत्र परिषदेत ही यादी सादर केली.

    उपमंत्र्यांच्या यादीतून तालिबानवर आंतरराष्ट्रीय टीकेचा कोणताही परिणाम झालेला दिसून आला नाही. तसेच सर्वसमावेशकता व महिलांच्या अधिकारांना कायम ठेवण्याच्या सुरुवातीच्या आश्वासनानंतरही ते आपल्या कट्टरवादी मार्गावर पुढे वाटचाल करीत असल्याचेच यातून सूचित होत आहे. तालिबानने आपल्या वर्तमान मंत्रिमंडळाला एका अंतरिम सरकारच्या रूपात तयार केले आहे.

    तसेच परिवर्तनाची अजूनही शक्यता असल्याचे सुचविले आहे. निवडणुकीबाबत मात्र त्यांनी अजूनही स्पष्टीकरण दिलेले नाही. मुजाहिदने एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येईल, यात हजारासारख्या अल्पसंख्यांक सदस्यांचा समावेश करण्यात येईल व महिलांनाही नंतर सहभागी करण्यात येऊ शकणार असल्याचे त्यांनी सांगितले.