‘5 वर्ष स्वर्गात राहिले’, वैद्यकीयदृष्ट्या मृत झाली होती महिला, पुन्हा जिवंत झाली, तेव्हा सांगितलं.. काय काय पाहिलं…

या सगळ्याचं वैज्ञानिक कारण शोधण्यात आलं. त्यात मृत्यूच्या जवळ असणं हा एक वेगळा अनुभव असल्याचं सिद्ध झालंय. जेव्हा प्राण धोक्यात असतो तेव्हा ही स्थिती निर्माण होऊ शकते. या काळात अनेक जणं वेगवेगळ्या बाबी अनुभवतात. त्यात काही सकारात्मक तर काही नकारात्मक असतात.

    नवी दिल्ली – हो, मी स्वर्ग पाहिला आहे, असा धक्कादायक दावा एका महिलेने केला आहे. इतकंच नाही तर स्वर्गात थडथोडके नाही तर 5 वर्ष घालवल्याचंही ते सांगतेय. तुम्हाला विश्वास बसणार नाही, प़ण हो ही महिला सध्या या जगात आहे. आता ती करत असलेले दावे किती खरे, याबाबत शंका उपस्थित करता येऊ शकतेच. प़ण या महिलेने सगळ्यांच्या स्वप्नांच्या कल्पनांना छेद देणारा स्वर्गाचा अनुभवच कथन केलाय.

    नेमका काय आहे प्रकार?

    स्वर्गात जाऊन आल्याचा दावा करत असलेल्या या महिलेचं नाव आहे लिंडा क्रैनर. लिंडा १४ मिनिटांहून अधिक काळासाठी वैद्यकीयदृष्ट्या मृत झाली होती. त्यानंतर जागृत झालेल्या लिंडानं मृत्यूनंतरच्या जगाची माहिती दिलीय. माऊंट एव्हरेस्टपेक्षाही ३० हजार पट मोठा पर्वत पाहिल्याचा दावा ती करतेय. आफ्टर लाईफ जगाबद्दल तिनं बरचं सांगितलं आहे. आफ्टर लाईफ म्हणजे मृत्यूनंतरचं जीवन.

    कधी घडला हा प्रकार?

    ही घटना ६ मे २००१ ची आहे. लिंडा बाथरुममध्ये जात असताना अचानक तिचा मृत्यू झाला. मात्र तिच्या दाव्यानुसार तिचा प्रवास संपलेला नव्हता. डॉक्टर जेव्हा तिला वाचवण्याचा प्रयत्न करीत होते त्यावेळी ती स्वर्गात पोहचली होती असा दावा तिनं केलाय. जेव्हा तीचे श्वास पुन्हा सुरु झाले. तेव्हा तिनं मृत्यूपलिकडच्या जगातले अनुभव शेअर केले आहेत. जितका वेळ ती स्वर्गात होती तो काळ ५ वर्षांचा होता, असं तिनं सांगितलय. जेव्हा तिचा मृत्यू झाला आणि तिच्या शरिरावर उपाचर सुरु होते तेव्हा हवेत होतो, असं तिनं एका यू ट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलेलं आहे. उपचारानंतर काही काळानं पुन्हा या जगात आल्याचंही ती सांगतेय

    खूप मोठे पर्वत पाहिल्याचा दावा

    पृथ्वीवर अस्तित्वातच नसलेल्या अनेक गोष्टींचा उल्लेख ती करतेय. खूप सार्या फुलं असलेल्या बागेत आपण उभे होते, असं ती सांगतेय. एव्हरेस्टच्या उंचीच्या ३०, ००० पट उंचीचे पर्वत पाहिल्याचा दावा ती करतेय. तसंच गगनचुंबी इमारती, झरे, तलावांची सुंदर दृश्य पाहिल्याचं तिचं म्हणणंय.

    या सगळ्याचं वैज्ञानिक कारण शोधण्यात आलं. त्यात मृत्यूच्या जवळ असणं हा एक वेगळा अनुभव असल्याचं सिद्ध झालंय. जेव्हा प्राण धोक्यात असतो तेव्हा ही स्थिती निर्माण होऊ शकते. या काळात अनेक जणं वेगवेगळ्या बाबी अनुभवतात. त्यात काही सकारात्मक तर काही नकारात्मक असतात. या काळात मृत नातेवाईक, धार्मिक बाबी किंवा शरिराबाहेर असलेल्या आत्म्याबाबत बोलतात.