अवघ्या १९ वर्षांचा दहशतवादी : ISI ने २० हजार दिल्यामुळे बनला आतंकवादी, जिवंत पकडलेल्या दहशतवाद्याचे खुलासे

अली बाबर हत्यारं पुरवण्यासाठी पाकिस्तानातून भारतात आलो होतो, असं त्याने सांगितलं. ISI ने पैसे दिल्यामुळेच आपण या कारवायांसाठी तयार झालो. इतकंच नाही तर पाकिस्तानी सैन्याने आपल्याला ट्रेनिंग दिलं असे धक्क्दायक खुलासे अली बाबरने केले आहेत.

    श्रीनगर :अली बाबर हा पाकिस्तानातील पंजाब प्रांताताली ओकारा इथला रहिवासी आहे. त्याचं वय अवघं १९ वर्ष आहे. पाकिस्तानातील हबीबुल्लाह खोऱ्यात त्याला दहशतवादी कारवायांचं प्रशिक्षण मिळालं. बाबरला पट्टन परिसरात हत्यारं पोहोचवण्याची जबाबबादी दिली होती. दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तानातून भारतात आलेल्या दहशतवाद्याला उरी इथं जिवंत पकडल्यानंतर त्याने आता धक्कादायक खुलासे केले आहेत.

    हे दिले होते काम
    अली बाबर हत्यारं पुरवण्यासाठी पाकिस्तानातून भारतात आलो होतो, असं त्याने सांगितलं. ISI ने पैसे दिल्यामुळेच आपण या कारवायांसाठी तयार झालो. इतकंच नाही तर पाकिस्तानी सैन्याने आपल्याला ट्रेनिंग दिलं असे धक्क्दायक खुलासे अली बाबरने केले आहेत.मला २० हजार रुपये अॅडव्हान्स मिळाले होते, याशिवाय माझ्या कुटुंबाला ३० हजार रुपये देण्यात आले होते. मला ISI ने पैसे पुरवले. पाकिस्तानमध्येच माझं ट्रेनिंग झालं, अशी कबुली अली बाबरने दिली.

    मिळू शकतात इतर धागेदोरे
    बाबरला पट्टन परिसरात हत्यारं पोहोचवण्याची जबाबबादी दिली होती. मात्र केवळ हत्यारं पोहोचवणं इतकीच त्याची जबाबदारी असू शकत नाही, तो अन्य दहशतवादी कारवायाही करण्याच्या तयारीत असू शकतो, अशी शंका भारतीय जवानांना आहे. बाबर हा गेल्या १० दिवसांपासून उरी परिसरात लपून बसला होता. तो एका नाल्यात लपला होता. भारतीय सुरक्षा रक्षकांनी त्याला शोधून काढलं आणि जिवंत पकडलं.