khalistani disownes tiranga

रविवारी काही खलिस्तान समर्थकांनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयातून भारतीय राष्ट्रध्वज खाली आणण्याचा प्रयत्न केला आणि खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. तसेच दूतावासाची तोडफोड केली. मात्र, भारतीय उच्चायुक्तालयातील एका अधिकाऱ्याने मोठे धाडस दाखवत खलिस्तानींना विरोध करत खलिस्तानी ध्वज फडकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांकडून खलिस्तानी झेंडा फेकून दिला. या प्रकरणी यूकेचे खासदार बॉब ब्लॅकमन यांनी पोलिसांकडून कारवाईची मागणी केली आहे.

नवी दिल्ली : लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर (Indian High Commission) खलिस्तानी समर्थकांनी ( Khalistani Supporter ) केलेल्या हल्ल्यावर ब्रिटिश खासदार बॉब ब्लॅकमन यांनी संताप व्यक्त केला आहे. बॉबने खलिस्तानी समर्थकांना इशारा दिला आणि लंडन पोलिसांना त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यास सांगितले. बॉब म्हणाले, ‘हा शीख समुदायाचा एक अतिशय लहान भाग आहे. या देशातील बहुसंख्य शीख खलिस्तानी प्रकल्प आणि विचारधारा पूर्णपणे नाकारतात… आणि आम्हाला हे माहीत आहे. पोलिसांना माझा संदेश अतिशय सोपा आणि स्पष्ट आहे. जेव्हा असे घडते (खलिस्तानी समर्थकांकडून भारतीय समुदायावर किंवा दूतावासावर हल्ला) तेव्हा त्या लोकांना अटक करा आणि त्यांना धडा शिकवा. त्यांना योग्य पद्धतीने हाताळण्याची गरज आहे.

लंडनमध्ये काय घडलं?

भारतात वारिस पंजाब दे संघटनेचे प्रमुख  खलिस्तानी अमृतपाल सिंग यांच्यावर  सध्या कारवाई सुरू आहे. या कारवाईमुळे खलिस्तान समर्थकांमध्ये खळबळ उडाली असून त्यांच्याकडून निदर्शने करण्यात येत आहेत. लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयातील निदर्शने हा देखील या निषेधाचा एक भाग होता.

लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात गोंधळ

रविवारी काही खलिस्तान समर्थकांनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयातून भारतीय राष्ट्रध्वज खाली आणण्याचा प्रयत्न केला आणि खलिस्तान समर्थक घोषणा दिल्या. तसेच दूतावासाची तोडफोड केली. मात्र, भारतीय उच्चायुक्तालयातील एका अधिकाऱ्याने मोठे धाडस दाखवत खलिस्तानींना विरोध करत खलिस्तानी ध्वज फडकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या  तरुणांकडून खलिस्तानी झेंडा फेकून दिला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला असुन लोक भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याच्या धाडसाचे कौतुक करत आहेत. या घटनेनंतर खलिस्तानींना चोख प्रत्युत्तर देताना भारतीय उच्चायुक्तालयावर मोठा तिरंगा ध्वज फडकवण्यात आला आहे.