उड्डाणाच्या वेळी विमानाला बसले धक्के; सात जण जखमी, धीर द्यायचं सोडुन एअरलाइनने प्रवाशांना फोटो, व्हिडिओ डिलिट करण्यास सांगितले

विमानातील एका प्रवाशाने सांगितले की, जेव्हा त्याला घटनेची छायाचित्रे आणि व्हिडिओ हटवण्यास सांगण्यात आले तेव्हा ते ऐकून धक्का बसला.

सध्या रोज कुठे ना कुठे फ्लाईटमध्ये काही ना काही अशा विचित्र घटना घडताना दिसत आहेत ज्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. लंडन-मुंबई फ्लाईटमध्ये एका प्रवाशाने धुम्रपान केल्याची घटना ताजी असतानाच आता अमेरिकेत पुन्हा एक घटना समोर आली आहे. प्रवासादरम्यान लुफ्थान्सा एअरलाइन्सच्या (Lufthansa Airline)विमानाला मध्यभागी धक्का बसला आणि त्यात सात प्रवासी जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यानंतर विमानाचे अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रवाशांना धिर देण्याऐवजी विमानातून उतरण्यापूर्वी विमान कंपनीने सर्व प्रवाशांना घटनेची छायाचित्रे आणि व्हिडिओ हटवण्यास सांगितले. या घटनेमुळे प्रवाशांनाी संताप व्यक्त केला आहे.

नेमकं काय घडलं?

विमानातील एका प्रवाशाने सांगितले की, जेव्हा त्याला घटनेची छायाचित्रे आणि व्हिडिओ हटवण्यास सांगण्यात आले तेव्हा ते ऐकून धक्का बसला. लुफ्थांसा एअरलाइन्सचे एअरबस ए३३०-३०० अमेरिकेतील ऑस्टिनहून फ्रँकफर्टला जात असताना १ मार्च रोजी ही घटना घडली. वाटेत विमान सुमारे ३७ हजार फूट उंचीवर असताना त्याला अनेक हादरे बसले. यानंतर विमानाचे अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील डुलेस विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. भूकंपाच्या धक्क्यामुळे विमानातील सात जण जखमी झाले, त्यांना नंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. धक्क्यानंतर विमानातील खाद्यपदार्थ इकडे तिकडे विखुरले होते. प्रवाशांना फोट डिलिट करण्यास सांगण्यात आले मात्र, असे असतानाही विमानाचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


या घटनेचा व्हिडिओही व्हायरल होत असुन भूकंपाच्या धक्क्यांमुळे विमानातील खाद्यपदार्थ इकडे तिकडे विखुरल्याचे चित्र सध दिसत आहे. विमानाचेही किरकोळ नुकसान झाले. या धक्क्यांमुळे प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. एका प्रवाशाच्या नितंबाचे हाडही तुटले. , विमान सुमारे 4 हजार फूट घसरले, त्यामुळे विमानातील प्रवाशांना धक्काच बसला.