पुण्यातील मराठमोळी मुलगी झाली अब्जाधीश ; कंपनीने पहिल्याच दिवशी अमेरिकन शेअर बाजारात केली कमाल

तीन संस्थापकांपैकी दोन संस्थापक अब्जाधीश झाले आणि तिसरी संस्थापक अब्जाधीश होण्याच्या वाटेवर आहे. ती तिसरी संस्थापक एक मराठी मुलगी आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्या मुलीचं नाव आहे नेहा नारखेडे (Neha Narkhede). कंपनी स्थापन केल्यापासून सात-आठ वर्षांत हे यश त्यांना मिळालं आहे.

    न्यूयॉर्क :  कॅलिफोर्नियातली कॉन्फ्लुएंट (Confluent IPO) ही कंपनी अमेरिकेतल्या नॅस्डॅक या शेअर बाजारात गुरुवारी २४ जून लिस्ट झाली. ३६ डॉलर्स प्रति शेअर या मूल्यासह दाखल झालेल्या आयपीओद्वारे (IPO) ८२८ दशलक्ष डॉलर उभे केले गेले. त्यामुळे कंपनीचं मूल्यांकन ९.१ अब्ज डॉलर एवढं झालं. शेअर बाजाराच्या पहिल्याच दिवसाच्या शेवटी कॉन्फ्लुएंटच्या शेअर्सच्या मूल्यामध्ये जवळपास २५ टक्के वाढ झाली आणि ते मूल्य ४५.०२ डॉलर प्रति शेअर एवढं झालं.

    अमेरिकन शेअर बाजारात पहिल्याच दिवशी IPO आल्यानंतर हा एवढा भाव मिळवल्याने Confluent कंपनीची जोरदार चर्चा आहे. पण आपल्यासाठी याहून मोठी बातमी आहे. या कंपनीची सहसंस्थापक आहे नेहा नारखेडे-पुण्यात वाढलेली एक मराठी तरुणी. कुठलीही  पार्श्वभूमी नसताना अमेरिकेत शिकायला जाऊन तिथे स्वकर्तृत्वावर मोठी झालेल्या टेक्नोक्रॅट किंवा तंत्रज्ञान उद्योजिकेची प्रेरणादायी यशाची खरी बातमी आहे.

    तीन संस्थापकांपैकी दोन संस्थापक अब्जाधीश झाले आणि तिसरी संस्थापक अब्जाधीश होण्याच्या वाटेवर आहे. ती तिसरी संस्थापक एक मराठी मुलगी आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्या मुलीचं नाव आहे नेहा नारखेडे (Neha Narkhede). कंपनी स्थापन केल्यापासून सात-आठ वर्षांत हे यश त्यांना मिळालं आहे.

    एका मासिकेने दिलेल्या माहितीनुसार, जय क्रेप्स, नेहा नारखेडे आणि जून राव हे तिघे लिंक्डइन (LinkedIn) या प्रसिद्ध आणि व्यापक प्रोफेशनल नेटवर्क कंपनीचे कर्मचारी होते. लिंक्डइनवर प्रचंड प्रमाणात येणारे मेसेजेस, नेटवर्क रिक्वेस्ट्स आणि प्रोफाइल व्ह्यूज आदींचं व्यवस्थापन सोपं होण्याच्या दृष्टीने या तिघांनी क्लाउड तंत्रज्ञानावर आधारित असलेलं एक टेक्निकल टूल 2011मध्ये विकसित केलं.