युक्रेनमध्ये मार्शल लॉ; झेलेन्स्कींविरुद्ध प्रथमच बंड, विरोधक तुरुंगात

काही धनाढ्य लोक राष्ट्रपती झेलेन्स्कींसाठी डोकेदुखी ठरले होते. रशियन हल्ल्यापूर्वी ते युक्रेनच्या विरोधी पक्षांना देणगी देत होते. मालमत्ता जप्त झाल्यानंतर या धनाढ्य लोकांचा पाठीचा कणाच तुटला आहे. या धनाढ्यांची मालमत्ता जप्त केल्याने सरकारी तिजोरीत वाढ झाली. कारवाईमुळे पाश्चिमात्य देशही खूश आहेत. यामुळे युक्रेनला आर्थिक आणि लष्करी मदतही मोठ्या प्रमाणात मिळत आहे.

  किव्ह – युक्रेनमध्ये (Ukraine) वीज कपात, पाणीटंचाई असतानाच कडाक्याची थंडीही आहे. राष्ट्रपती झेलेन्स्कींविरोधात (Volodymyr Zelenskyy) प्रथमच जनतेचे बंडाचे (Rebellion) सूर उमटत आहेत. किव्हसह व्हिनितसिया, मायकोलोव्ह आणि ओडेसा शहरात लोकांनी आंदोलने करीत आहेत. मार्शल लॉ (Marshal Law) लागू होण्याचा राजकीय फायदा झेलेन्स्की आपल्या हितासाठी घेत आहेत. व्हिक्तोर मेदवेचुकसह (Viktor Medvedchuk) जवळपास सर्वच विरोधी पक्षनेत्यांना तुरुंगात टाकले आहे. नंतर ते तुरुंगातून पळाले.
  झेलेन्स्कींनी ११ प्रमुख विरोधी पक्षांची मान्यता रद्द केली आहे. यात फॉर लाइफ पक्षाचाही समावेश आहे. संसदेत एफएलपी सर्वात मोठा विरोधी पक्ष होता. विरोधी पक्षांची मान्यता रद्द करतानाच हे पक्ष रशियाचे समर्थक असल्याचा आरोप झेलेन्स्कींनी केला होता.

  काही धनाढ्य लोक राष्ट्रपती झेलेन्स्कींसाठी डोकेदुखी ठरले होते. रशियन हल्ल्यापूर्वी ते युक्रेनच्या विरोधी पक्षांना देणगी देत होते. मालमत्ता जप्त झाल्यानंतर या धनाढ्य लोकांचा पाठीचा कणाच तुटला आहे. या धनाढ्यांची मालमत्ता जप्त केल्याने सरकारी तिजोरीत वाढ झाली. कारवाईमुळे पाश्चिमात्य देशही खूश आहेत. यामुळे युक्रेनला आर्थिक आणि लष्करी मदतही मोठ्या प्रमाणात मिळत आहे.

  झेलेन्स्कींकडून युक्रेनमधील सर्व खासगी चॅनल्सचे राष्ट्रीयीकरण झेलेन्स्कींनी सर्व खासगी टीव्ही चॅनल्सचे राष्ट्री

  यीकरण केले. याला एकात्मिक माहिती धोरण असे नाव दिले आहे. चॅनल्सवर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचा कंटेंट आधी सीक्युरिटी सर्व्हिस ऑफ युक्रेनकडून (एसबीयू) पास करून घ्यावा लागतो. झेलेन्स्की किंवा सरकारविरोधात सोशल मीडियावर युद्धाचे व्हिडिओज टाकता येत नाहीत.

  विरोधक धनाढ्यांची ६९ टक्के मालमत्ता केली जप्त रशियाच्या हल्ल्यामुळे झेलेन्स्की आपल्या विरोधी धनाढ्यांवरही फास आवळण्यात यशस्वी ठरले. धनाढ्य रिनत अखमेतोव्ह यांची मालमत्ता रशियन हल्ल्यानंतर १.१२ लाख कोटींनी घटून ३५ हजार कोटी राहिली आहे.