Mask on an 18-foot-tall statue of Buddha in Japan

पूर्ण जग कोरोनाच्या खात्म्यावरून चिंतेत आहे. अनेक ठिकाणी होम-यज्ञ सुरू आहेत, तर वैद्यकीय शास्त्र महामारी संपविण्यासाठी संशोधन करत आहे तर जपानमध्ये बुद्धांच्या एका पुतळ्यावर मास्क लावण्यात आला आहे. एका प्रार्थनेदाखल असे करण्यात आले आहे. ही प्रार्थना कोरोना महामारीच्या उच्चाटनासाठी करण्यात आली होती.

    दिल्ली : पूर्ण जग कोरोनाच्या खात्म्यावरून चिंतेत आहे. अनेक ठिकाणी होम-यज्ञ सुरू आहेत, तर वैद्यकीय शास्त्र महामारी संपविण्यासाठी संशोधन करत आहे तर जपानमध्ये बुद्धांच्या एका पुतळ्यावर मास्क लावण्यात आला आहे. एका प्रार्थनेदाखल असे करण्यात आले आहे. ही प्रार्थना कोरोना महामारीच्या उच्चाटनासाठी करण्यात आली होती.

    पुतळ्यावर मास्क लावण्यासाठी 3 तासांहून अधिक कालावधी लागला आहे. चार जणांनी मिळून हे काम पूर्ण केले आहे. दोरखंडांच्या मदतीने ते पुतळ्याच्या चेहऱ्यापर्यंत पोहोचले आणि त्यांनी 187 फूट उंचीच्या या पुतळ्याला फेसमास्क लावला आहे. हा पुतळा फुकुशिमा येथील एका मंदिर परिसरात उभारण्यात आला आहे.

    गुलाबी रंगाच्या नेट फॅब्रिकचा मास्क बुद्धांच्या पुतळ्यावर लावण्यात आला आहे. हा मास्क 13.45 फुट गुणिले 17.83 फुटांचा आहे. या मास्कचे वजन सुमारे 34 किलो इतके होते. हा पुतळा 33 वर्षांपूर्वी उभारण्यात आला होता. याच्या आतमध्ये जिना असून जो पुतळ्याच्या खांद्यापर्यंत जातो.