इराणच्या लष्करी प्लांटमध्ये जोरदार स्फोट; जिवीतहानी नाही, अयशस्वी ड्रोन हल्ला असल्याचा संरक्षण मंत्रालयाचा दावा

इराणचे राज्य प्रसारक IRIB ने रविवारी पहाटे आपल्या वेबसाइटवर ही माहिती दिली. हा अयशस्वी ड्रोन हल्ला असल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

    इराण: इराणमध्ये भूकंप (iran Earthquake) झाल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा इराणमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. इराणच्या मध्यवर्ती शहर इस्फहानमधील लष्करी प्लांटमध्ये मोठा स्फोट झाला आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले आहे. इराणचे राज्य प्रसारक IRIB ने रविवारी पहाटे आपल्या वेबसाइटवर ही माहिती दिली.

     मात्र, हा अयशस्वी ड्रोन हल्ला असल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. आयआरआयबीने अधिक तपशील न देता सांगितले की, संरक्षण मंत्रालयाच्या एका दारूगोळा उत्पादन केंद्रात स्फोट झाला आणि सरकारच्या राजकीय आणि सुरक्षा उपप्रमुखांच्या माहितीनुसार,त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही नाही. 

    सविस्तर बातमी थोड्याच वेळात…