बांगलादेशातील निर्वासितांच्या छावण्यांमध्ये भीषण आग, १५ जणांचा मृत्यू तर ४०० पेक्षा जास्त बेपत्ता

फायर सर्व्हिस आणि सिव्हिल डिफेन्स डिपार्टमेंटचे जिल्हा प्रमुख मोहम्मद अब्दुल्ला यांनी मंगळवारी घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी रात्रभरात आग विझवली. तर, युएनएचसीआरच्या जोहान्स वान डर क्लाव्ह यांनी म्हटले या घटनेत किमान १५ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि ४०० पेक्षा जास्त बेपत्ता आहेत.

    ढाका : बांगलादेशातील कॉक्स बाजार जिल्ह्यात रोहिंग्या निर्वासितांच्या छावण्यांमध्ये आग लागल्याने किमान १५ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक लोक जखमी झाले. या दुर्घटनेनंतर किमान ४०० रोहिंग्या निर्वासित बेपत्तासुद्धा आहेत.

    फायर सर्व्हिस आणि सिव्हिल डिफेन्स डिपार्टमेंटचे जिल्हा प्रमुख मोहम्मद अब्दुल्ला यांनी मंगळवारी घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी रात्रभरात आग विझवली. तर, युएनएचसीआरच्या जोहान्स वान डर क्लाव्ह यांनी म्हटले या घटनेत किमान १५ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि ४०० पेक्षा जास्त बेपत्ता आहेत.

    फायर सर्व्हिस आणि सिव्हिल डिफेन्स डिपार्टमेंटचे जिल्हा प्रमुख मोहम्मद अब्दुल्ला यांनी म्हटले की, विविध एजन्सीजद्वारे संचालित उपचार केंद्रांमध्ये जखमींवर उपचार सुरू आहेत आणि सरकार नुकसानीची माहिती घेत आहे. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.