maulana fatwa on emoji

सोशल मीडियावरील प्रसिद्ध मौलाना अहमदुल्लाह (Maulana Ahmadullah) यांनी फेसबुक (Facebook) वर लोकांची खिल्ली उडविण्यासाठी वापरली जाणारी इमोजी ‘हाहा’ च्या वापराविरोधात फतवा जारी करीत याचा वापर चुकीचा असल्याचं सांगितलं आहे.

    ढाका : बांग्लादेशच्या (Bangladesh) मौलानांनी (Maulana) एक विचित्र फतवा जारी केला आहे. सध्या यावरुन सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. मौलानांनी फेसबुकच्या हसण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इमोजीविरोधात फतवा (Fatwa Against Facebook Haha Emoji) जारी केला आहे. सोशल मीडियावरील प्रसिद्ध मौलाना अहमदुल्लाह (Maulana Ahmadullah) यांनी फेसबुक (Facebook) वर लोकांची खिल्ली उडविण्यासाठी वापरली जाणारी इमोजी ‘हाहा’ च्या वापराविरोधात फतवा जारी करीत याचा वापर चुकीचा असल्याचं सांगितलं आहे.

    मौलाना अहमदुल्लाह यांनी तीन मिनिटांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आणि यात फेसबुकवर ‘हाहा’ इमोजी (Facebook Haha Emoji) माध्यमातून लोकांची खिल्ली उडवली जात असल्याचं सांगितलं. यानंतर मौलानांनी एक फतवा जारी केला आहे. यात मौलाना म्हणाले की, असं करणं मुस्लिमांसाठी हराम आहे.

    अहमदुल्लाह यांनी सांगितलं की, आजच्या परिस्थितीत लोकांची खिल्ली उडविण्यासाठी हाहा या इमोजीचा वापर करीत आहोत. आतापर्यंत मौलानांचा हा व्हिडीओ २०ग लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. जर तुम्ही हाहा इमोजीचा वापर (Haha Emoji) केवळ मनोरंजानासाठी करीत असाल तर ठीक आहे. मात्र जर तुमचा हेतू सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या वा कमेंट करणाऱ्या व्यक्तीला बदनाम करण्याचं किंवा त्यांना टोचून बोलायचं असेल तर हे पूर्णपणे इस्लामच्या विरुद्ध आहे.

    मौलानांनी सांगितलं की, अल्लाच्या प्रेमाखातर मी तुम्हाला सांगतो की, अशा प्रकारचं कृत्य करणं बंद करा. हाहा इमोजीचा वापर लोकांची खिल्ली उडविण्यासाठी करू नका. जर तुम्ही एका मुस्लीम व्यक्तीला त्रास देत असाल तर तो अशा भाषेचा वापर करेल ज्याचा तुम्ही विचारही करू शकणार नाही. मौलानांच्या या व्हिडीओला अनेक प्रतिक्रिया आल्या आहे. अधिकतर प्रतिक्रिया या सकारात्मक असल्याचं सांगितलं जात आहे.