Miracle Women In Vietnam gives natural body odor

दुर्गंधी घालविण्यासाठी जगातील अनेक लोक डिओडरेंट किंवा परफ्यूमचा वापर करतात तर काही जणांना अॅलर्जी असल्याने ते परफ्यूमचा वापर करत नाहीत. पण एका महिलेला परफ्यूमची गरजच नाही. कारण या महिलेच्या शरीरातून नैसर्गिक स्वरूपात सुगंध येतो. व्हिएतनामच्या सोशक त्रांग प्रांता राहणारी दैंग थी तुई दिसण्यास एक सर्वसामान्य महिलेसारखी असली तरी लोकांना तिच्या सुपरपॉवरसंबंधी कळल्यास प्रत्येकजण दंग होतो. दैंगच्या शरीरातून परफ्यूमसारखा सुगंध येतो, पण ती डिओ किंवा परफ्यूमचा वापर करत नाही(Miracle Women In Vietnam gives natural body odor).

  दिल्ली : दुर्गंधी घालविण्यासाठी जगातील अनेक लोक डिओडरेंट किंवा परफ्यूमचा वापर करतात तर काही जणांना अॅलर्जी असल्याने ते परफ्यूमचा वापर करत नाहीत. पण एका महिलेला परफ्यूमची गरजच नाही. कारण या महिलेच्या शरीरातून नैसर्गिक स्वरूपात सुगंध येतो. व्हिएतनामच्या सोशक त्रांग प्रांता राहणारी दैंग थी तुई दिसण्यास एक सर्वसामान्य महिलेसारखी असली तरी लोकांना तिच्या सुपरपॉवरसंबंधी कळल्यास प्रत्येकजण दंग होतो. दैंगच्या शरीरातून परफ्यूमसारखा सुगंध येतो, पण ती डिओ किंवा परफ्यूमचा वापर करत नाही(Miracle Women In Vietnam gives natural body odor).

  अनेक वर्षांनंतर समजली सुपरपॉवर

  दैंग या अजब सुपरपॉवरद्वारे कुणालाही थक्क करू शकते. तिला भेटलेल्या लोकांनुसार तिच्या शरीरातून सुगंध येतो. दिवसभर काम केल्यावर हात-पाय धुवून घेत असताना स्वतःच्या शरीरातून सुगंध येत असल्याचे दैंगला काही वर्षांपूर्वी आढळून आले होते. त्यानंतर तिने स्वतःची त्वचा अधिक चोळल्यावर त्यातून अधिकच सुगंध येऊ लागला. तिच्या या सुपरपॉवरची चाचणी डॉक ला बिन्ह टय़ुऑन्ग नावाच्या युटय़ूब चॅनलने केली आहे.

  पौर्णिमेला सर्वाधिक सुगंध

  दैंगने स्वतःच्या या शक्तीबद्दल बोलताना शरीराच्या काही हिस्स्यांमधून अधिक सुगंध येत असल्याचा दावा केला आहे. रात्रीदरम्यान सुगंध वाढतो, तर दिवसा लोकांना त्वचा चोळावी लागते, त्यानंतरच सुगंध जाणवतो, पण रात्रीच्या वेळी काही मीटरवर असलेल्या लोकांनाही सुगंध येतो. मासिक पाळीदरम्यान हा सुगंध कमी होतो. तर पौर्णिमेच्या दिवशी सुगंध सर्वाधिक असतो असे दैंगने म्हटले आहे.

  आणखी एका महिलेचा दावा

  दैंग स्वतःच्या या व्हीडिओद्वारे प्रसिद्ध झाल्यावर व्हिएतनामची आणखीन एक महिला दुंगनेही स्वतःच्या शरीरातून सुगंध येत असल्याचा दावा केला. त्वचा चोळल्यावर सुगंध येत असल्याचा तिचा दावाही खरा ठरला आहे.