
तरीही त्यांना आयसीयुमध्येच ठेवले होते. अचानक 45 मिनिटांनी कैथी यांच्यात संवेदना जाणवल्या. त्यांचा श्वास परत आला आणि मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठाही सुरळीत झाल्याचे डॉक्टरांच्या निर्दशनास आले. यामुळे त्यांनी पुन्हा एकदा उपचार सुरु केले. काही वेळातच त्यांची प्रकृती स्थिर झाली. हे सर्व पाहून डॉक्टरांनाही शॉक बसला. वैद्यकीय क्षेत्रातील हा एक चमत्कारच असल्याचे डॉक्टर म्हणाले.
न्यूयॉर्क : मेलेली व्यक्ती एकदा गेली गेली ती परत येत नाही. मात्र, एखादी व्यक्ती मेल्यानंतर ती पुन्हा जिवंत झाली असं कुणी सांगीतले कुणाचाच विश्वास बसणार नाही. मात्र, हे खरं झालं आहे. अमेरीकेत हा चमात्कार झाला आहे.
कैथी पॅटन या महिलेसोबत हा चमत्कार घडला आहे. अमेरिकेच्या मेरीलँडमध्ये त्या राहतात. मैदानात गोल्फ खेळत असताना त्यांना अचानक हार्ट अटॅक आला आणि त्या जागेवरच कोसळल्या.
कैथी यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या हृदयाचे ठोके पूर्णतः थांबले होते. तसेच मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठाही बंद झाला. अखेरचा उपाय म्हणून डॉक्टरांनी सीपीआर (CPR) द्यायला सुरुवात केली. मात्र, कैथी यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.
मात्र, तरीही त्यांना आयसीयुमध्येच ठेवले होते. अचानक 45 मिनिटांनी कैथी यांच्यात संवेदना जाणवल्या. त्यांचा श्वास परत आला आणि मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठाही सुरळीत झाल्याचे डॉक्टरांच्या निर्दशनास आले. यामुळे त्यांनी पुन्हा एकदा उपचार सुरु केले. काही वेळातच त्यांची प्रकृती स्थिर झाली. हे सर्व पाहून डॉक्टरांनाही शॉक बसला. वैद्यकीय क्षेत्रातील हा एक चमत्कारच असल्याचे डॉक्टर म्हणाले.
दरम्यान, कैथी यांच्यावर उपचार सुरू असतानाच दुसरीकडे त्यांच्या मुलीची डिलिव्हरी झाली आणि कैथी आजी झाल्या. या चमत्काराची सोशल मिडीयावर चांगलीच चर्चा आहे.