पृथ्वीला वाचवण्यासाठी क्षेपणास्त्राच्या सहाय्याने उल्कापिंडाची दिशा बदलवणार ; नासा आज दुपारी करणार हा मिशनची सुरुवात, जाणून घ्या कशी वाचणार पृथ्वी

अंतराळात अनेक उल्कापिंडे वर्षानुवर्षे भ्रमण करीत असतात. त्यांच्या वेगात थोडाही बदल झाला तर काळानुरुप त्याचा मोठा परिणाम होतो. अशा प्रयोगांनी उल्कापिंडाच्या दिशेत आणि गतीत थोडा जरी बदजल जाला, तरी पृथ्वीवर उल्कापिंड येण्याच्या संकटापासून आपली मुक्तता होऊ शकेल.

  वॉशिंग्टन : अमेरिकेची अंतराळ संस्था नासा आज पृथ्वीला वाचवण्यासाठी पहिले डार्ट मिशन लॉन्च करणार आहे. आज दुपारी भारतीय वेळेनुसार ११.५० मिनिटांनी स्पेस क्राफ्टची लाँच विंडो उघडण्यात येणार आहे. याचा अर्थ असा की हवामान आणि इतर परिस्थिती लक्षात घेता, हे मिशन कधीही लाँच करण्यात यईल. या मिशनमध्ये नासा उल्कापिंडाची स्पेसक्राफ्टशी धडक घडवून आणणार आहे. या धड़केमुळे उल्कापिंडाची गती आणि दिशा बदलली जाईल. कोणत्याही उल्कापिंडाची दिशा विंका गती अशा धडकेमुळे किती बदलता यील, हे या प्रयोगामुळे कळणार आहे. अशा प्रयोगामुळे आगामी संकटातून पृथ्वीचे रक्षण करता येणे, सहज शक्य होईल का, याचीही पडताळणी करण्यात येणार आहे.

  समजून घ्या नासाचे मिशन
  नासाने या मिशनला डार्ट ( डबल अस्ट्राईड रिडायरेक्शन टेस्ट) असे नावा दिले आहे. अंतराळातून पृथ्वीकडे वेगाने येत असलेल्या एखाद्या उल्कापिंडाला पृथ्वीवर येण्यापासून कसे रोखता येईल, हे या मिशनमधून जाणून घेण्याचा नासाचा प्रयत्न आहे. या मिशनमध्ये नासा एक स्पेसक्राफ्ट तयार करीत आहे, हे स्पेसक्राफ्ट डिमार्फोस नावाच्या उल्कापिंडाला धडक देणार आहे. या धडकेमुळे डिमार्फोसच्या गतीत आणि दिशेत किती फरक पडणार आहे, याची तपासणी करण्यात येणार आहे. आजच्या प्रयोगाच्या आधारावर, उल्कापिंडची गती आणि दिशा किती प्रमाणात आणि कशी बदलता येईल, यावर येत्या काळात विचार करण्यात येईल. या मिशनसाठी २ हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात येतो आहे.

  कोणत्या उल्कापिंडाला देण्यात येणार धडक
  स्पेसक्राफ्ट डिडिमोस नावाच्या उल्कापिंडाला धडक देणार आहे. डिडिमोस हे दोन भागांचे उल्कापिंड असून, याचा शोध १९९६ साली लागला होता. या उल्कापिंडाचा मोठा भाग हा ७८० मीटर असून, त्याचे नाव डिडिमोसस असे आहे. तर लहान भाग हा १६० मीटरचा असून त्याला डिमोर्फस म्हटले जाते. सध्या उल्कापिंडाचा लहान भाग मोठ्या भागाभोवती परिक्रमा करीत आहे.

  डिडिमोस पृथ्वीवर कधीही आदळणार नाही, त्यामुळे या उल्कापिंडापासून पृथ्वीला धोका नाहीये. त्यामुळेच या मिशनसाठी नासाने या उल्कापिंडाची निवड केली आहे. भविष्यात उल्कापिंड पृथ्वीवर येत असेल, तर त्याला कसे रोखायचे हे जाणून घेण्यासाठी आजचे मिशन राबविण्यात येत आहे. यासह डिडिमोसच्या निवडीचे आणखी एक कारण म्हणजे, २००३ साली हे उल्कापिंड पृथ्वीजवळून गेले होते, आता २०२२ साली ते पुन्हा पृथ्वीजवळून जाणार आहे.

  प्रत्यक्षात मिशनमध्ये काय होणार

  • मिशनचा मुख्य भाग हा एक इम्पॅक्ट्र आहे. हे इम्पॅक्टर उल्कापिंडाच्या छोट्या भागाला ताशी सुमारे २३७६० किमी वेगाने धडक देणार आहे. यामुळे या उल्कापिंडाची गरती एका टक्क्यांनी कमी होणार आहे, तसेच या उल्कापिंडाच्या भ्रमण कक्षेतही बदल होण्याची शक्यता आहे.

  • मुख्य स्पेसक्राफ्ट मध्ये असलेले सेकंडरी स्पेस क्राफ्टही या मिशनचा महत्त्वाचा भाग आहे. हे सेकंडरी स्पेसक्राफ्ट, मिशनपूर्वी दोन दिवसमुख्य स्पेसक्राफ्टपासून विलिग होणार आहे, त्यानंतर धडकेच्यावेळी फोटो आणि इतर अपडेट्स पृथ्वीवर पाठविणे हे या सेकंडरी स्पेसक्राफ्टचे कार्य असेल. त्यामुळे इथल्या वैज्ञानिकांना या मिशनची क्षणाक्षणाची माहिती मिळेल.

  हे मिशन का महत्त्वाचे?
  अंतराळात अनेक उल्कापिंडे वर्षानुवर्षे भ्रमण करीत असतात. त्यांच्या वेगात थोडाही बदल झाला तर काळानुरुप त्याचा मोठा परिणाम होतो. अशा प्रयोगांनी उल्कापिंडाच्या दिशेत आणि गतीत थोडा जरी बदजल जाला, तरी पृथ्वीवर उल्कापिंड येण्याच्या संकटापासून आपली मुक्तता होऊ शकेल. त्यानंतरही ते पृथ्वीर येऊन धडकणार असेलच, तरी आपल्याला तयारीसाठी काही काळ अधिक मिळू शकणार आहे. त्यामुळे पृथ्वीवर होणारे नुकसान कमी होऊ शकेल. जर एखादे १०० मीटरचा उल्कापिंडची पृथ्वीवर धडकला तरी ते एका पूर्ण खंडावर हाहाकार उडवून देएऊ शकते. यावरुन या मिशनचे महत्त्व आपल्या लक्षात येईल.