
अमेरिका दौऱ्यादरम्यान, मोदी याच हॉटेलमध्ये राहणार आहेत. २३ सप्टेंबर रोजी अमेरिकेतील वेळेनुसार, सकाळी ९:४० वाजता (भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:१५ वाजता) पंतप्रधान मोदी आपल्या हॉटेलमध्ये वेळवेगळ्या CEO सोबत भेटीगाठी करतील.
वॉशिंग्टन: पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. भारतीय वेळेनुसार, मध्यरात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या वॉशिंग्टन डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Washington Dulles International Airport) दाखल झाले. विमानतळावर पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अनेक अधिकाऱ्यांसह अमेरिकेतील भारतातील राजदूत तरणजीत सिंह संधूही विमानतळावर उपस्थित होते.
US: Prime Minister Narendra Modi arrives at Joint Base Andrews, Washington DC for his 3-day visit.
He will be attending the first in-person Quad Leaders’ Summit, hold bilateral meetings, & address United Nations General Assembly pic.twitter.com/CzU3qabCVT
— ANI (@ANI) September 22, 2021
आपल्या या दौऱ्यात पीएम मोदी संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करतील आणि क्वाड देशांच्या नेत्य़ाशी बैठक करतील. याशिवाय, पंतप्रधान मोदी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. दरम्यान, काल (बुधवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेसाठी रवाना झाले होते. अमेरिकेत दाखल झाल्यानंतर पंतप्रधान मोदी आता थेट पेंसिलवेनिया एवेन्यू येथील हॉटेल विलार्ड इंटरकॉन्टिनेंटलसाठी रवाना होणार आहेत.
अमेरिका दौऱ्यादरम्यान, मोदी याच हॉटेलमध्ये राहणार आहेत. २३ सप्टेंबर रोजी अमेरिकेतील वेळेनुसार, सकाळी ९:४० वाजता (भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:१५ वाजता) पंतप्रधान मोदी आपल्या हॉटेलमध्ये वेळवेगळ्या CEO सोबत भेटीगाठी करतील. यामध्ये क्वॉलकॉमचे अध्यक्ष आणि CEO, अॅडॉबचे चेअरमन, फर्स्ट सोलरचे CEO, जनरल अॅटॉमिक्सचे चेअरमन आणि CEO आणि ब्लॅकस्टोनचे संस्थापक यांचा सहभाग असेल.
US: Prime Minister Narendra Modi steps out of his car to meet people who were waiting to welcome him at Joint Base Andrews in Washington DC pic.twitter.com/7m8avGg1Fn
— ANI (@ANI) September 22, 2021
मोदी आणि बायडन यांच्यात २४ सप्टेंबर रोजी द्विपक्षीय बैठक होईल. या बैठकीत पंतप्रधान मोदी आणि बायडन भारत-अमेरिकेतील संबंधांवर चर्चा करतील. तसेच या बैठकीत दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणूक संबंध मजबूत करणे, सुरक्षेसंबंधी तसेच स्वच्छ ऊर्जा भागिदारीला प्रोत्साहन देण्यासंदर्भात चर्चा होऊ शकते. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजीत डोभाल आणि विदेश सचिव श्रृंगला देखील असणार आहेत