आठ वर्षात मुलगी झाली ‘एलियन’ : ‘स्पेशल’ होण्याच्या इच्छेने केल्या १०० हून अधिक शस्त्रक्रिया, लाखोंचा खर्च करून केली स्वतःची ही अवस्था

विनी ओहला दुसऱ्या ग्रहातील रहिवाशांमध्ये खूप रस होता. त्यामुळे ती स्वतःला त्याच्यासारखं बनवण्याचा प्रयत्न करू लागली. आता तीची ही आवड सोशल मीडियावर चर्चेत आहे. विनी ओहला 'रिअल लाइफ एलियन' बनण्याच्या स्वप्नाने इतके पछाडले आहे. की ती आता पूर्णपणे वेगळी दिसते.

  नवी दिल्ली: सुंदर दिसण्याच्या हव्यासापोटी लोक काय करतील सांगता येत नाही? सौंदर्यप्रसाधने शस्त्रक्रियेपासून बोटॉक्स इंजेक्शनपर्यंत सगळे उपाय करतात. पण ही घटना थोडी वेगळी आहे. आम्ही तुम्हाला अशा मुलीबद्दल सांगणार आहोत जिच्या मनात एलियन बनण्याचे सवप्न होते. हे थोडं विचित्र वाटेल पण हे खरं आहे. एलियनसारखा लूक मिळवण्यासाठी, विनी ओहने त्याच्या शरीरावर सर्व प्रकारच्या प्लास्टिक सर्जरीद्वारे संपूर्ण रूप बदलले. एकेकाळी अतिशय सुंदर दिसणारी विनी पाहून आता लोक घाबरतात.

  दुसऱ्या ग्रहावरील लोकांसारखे दिसायचे होते

  विनी ओहला दुसऱ्या ग्रहातील रहिवाशांमध्ये खूप रस होता. त्यामुळे ती स्वतःला त्याच्यासारखं बनवण्याचा प्रयत्न करू लागली. आता तीची ही आवड सोशल मीडियावर चर्चेत आहे. विनी ओहला ‘रिअल लाइफ एलियन’ बनण्याच्या स्वप्नाने इतके पछाडले आहे. की ती आता पूर्णपणे वेगळी दिसते.

  एलियन लूक मिळवण्यासाठी लाखो खर्च

  अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये राहणाऱ्या २६ वर्षीय विनीने असा लूक मिळवण्यासाठी १०० हून अधिक सर्जरी केल्या आहेत. या शस्त्रक्रियांवर त्यांनी लाखो रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे त्यांचा संपूर्ण चेहराच बदलून गेला आहे. शरीराच्या सततच्या उपचारांमुळे आता विनी ओहला ओळखणेही कठीण झाले आहे. वयाच्या १७ व्या वर्षी विनीवर पहिल्यांदा शस्त्रक्रिया झाली होती. मग त्याच्या ओठांवर फिलर लावून त्याचा संपूर्ण आकार बदलला. त्यानंतर विनीने मागे वळून पाहिलेच नाही.

  विनी ओह सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इंस्टाग्रामवर तीचे फॅन फॉलोअर्सही चांगली आहेत. इन्स्टा वर तीला ५५९०० लोक फॉलो करतात. जेव्हा तीने लोकांना तीच्या आधीच्या आणि आताच्या लूकबद्दल सांगितले तेव्हा लोक आश्चर्यचकित झाले. कोणीतरी नाट्यमय परिवर्तनाची प्रशंसा केली. तर कोणी परिवर्तनाला मूर्ख म्हटले.