मोरोक्कोकडून झालेला पराभव बेल्जियमच्या जिव्हारी, राजधानी ब्रसेल्समध्ये उसळला हिंसाचार

या हिसांचारानंतर पोलिसांना अनेक भागात कडेकोट नाकाबंदी केली. यावेळी लोकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा आणि पाण्याचा वापर करावा लागला.

    कतारमध्ये सध्या सुरू असलेल्या फिफा विश्वचषकाच्या सामन्यात रविवारी मोरोक्कोने बेल्जियमवर विजय मिळवल्या त्यानतंर हार सहन न झाल्याने बेल्जियममधील लोकांचा राग अनावर झाला. यानंतर राजधानी ब्रसेल्समध्ये लोकांनी रस्त्यावर येत चांगलाच राडा केला. आंदोलकांनी कार आणि काही इलेक्ट्रिक स्कूटर पेटवल्या. अनेक ठिकाणी दंगली झाल्या. लोकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी पाण्याच्या तोफगोळ्या आणि अश्रुधुराच्या नळकांड्याचा वापर करावा लागला.

    बेल्जियमच्या दणदणीत पराभवानंतर उसळलेल्या हिसांचारात लोकांनी अनेक ठिकाणी तोडफोड केली. मोरोक्कोकडून हारल्यानंतर बेल्जियमच्या  मोरोक्कन वंशाच्या काही नागरिकांनी त्यांच्या विजयाचा आनंद साजरा करण्यास सुरुवात केली, त्यानंतर हिंसाचार उसळला.

    या हिसांचारानंतर पोलिसांना अनेक भागात कडेकोट नाकाबंदी केली. यावेळी लोकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा आणि पाण्याचा वापर करावा लागला. मोरोक्कोविरुद्धच्या अनपेक्षित पराभवामुळे संतप्त झालेल्या लोकांनी वाहनांमध्ये आग लावली आणि गाड्यांवर दगडफेक केली. पोलिसांनी किती जणांना ताब्यात घेतले आहे, याची माहिती अद्याप मिळालेली नाही.