आईने आपल्या ५ वर्षांच्या लेकीची चाकूने भोसकून केली हत्या, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

एका आईने आपल्या ५ वर्षाच्या मुलीची चाकूने भोसकून हत्या (Mother Killed her 5 Year Old Daughter) केली आहे. सुथा शिवनाथम असं या महिलेचं नाव आहे.

    लंडन :आई खरंतर आपल्या मुलासाठी काहीही करायला तयार असते. मात्र सध्या एक अशी घटना समोर आली आहे ज्यात आईने मुलीचं आयुष्य संपवलं आहे. एका आईने आपल्या ५ वर्षाच्या मुलीची चाकूने भोसकून हत्या (Mother Killed her 5 Year Old Daughter) केली आहे. सुथा शिवनाथम असं या महिलेचं नाव आहे. पोलिसांनी (Police) खूनाच्या प्रकरणात तिला अटक केली आहे. सध्या न्यायालयात सुनावणी सुरु आहे. लंडनमध्ये ही घटना घडली आहे.

    न्यायालयात (Court) सुनावणीदरम्यान असं समोर आलं आहे की, सुथा शिवनाथमनं आपल्याच मुलीची चाकूनं भोसकून हत्या केली. त्या महिलेला अशी भीती होती की तिचा कोरोनाने मृत्यू होणार आहे.

    सुथा शिवनाथम हिनं आपल्या दक्षिण लंडनमधील फ्लॅटच्या बेडरुममध्ये मुलगी सयागी शिवनाथम हिच्यावर चाकूनं १५ वेळा वार केले आणि तिची हत्या केली. यानंतर तिनं स्वतःवरही चाकूनं वार केले. यानंतर शेजाऱ्यांनी दोघींनाही रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केलं. न्यायालयात सुनावणीदरम्यान मुलीचे वडील सुगंथन शिवनाथम यांनी सांगितलं, की कोरोना महामारी आणि निर्बंधांचं त्यांच्या पत्नीवर अतिशय वाईट परिणाम झाला.

    मृत मुलीच्या वडिलांनी म्हटलं, की त्यांच्या पत्नीला अशी भीती होती की तिला कोरोना होईल आणि तिचा मृत्यू होईल. यानंतर ती जोरजोरानं रडू लागली. सुथा शिवनाथम आणि सुगंथन यांचं २००६ मध्ये लग्न झालं आहे. यानंतर हे कुटुंब लंडनमध्ये राहू लागलं. सुथा शिवनाथमवर उपचार करणाऱ्या एका मनोरुग्ण चिकित्सकानं सांगितलं की, महामारी आणि लॉकडाऊनचा तिच्या डोक्यावर गंभीर परिणाम झाला आहे आणि सोशल आयसोलेशनमुळे याचं गंभीर मानसिक आजारात रुपांतर झालं आहे.

    सुथाच्या पतीनं सांगितलं की, या घटनेनंतर तिच्याशी बोललेलो नाही. मात्र, मला माहिती आहे, की या घटनेसाठी ती जबाबदार नाही. ती ठीक असती, तर तिनं आमच्या मुलीला कधीच मारलं नसतं, असं तिच्या पतीनं म्हटलं आहे.