बापरे! इंग्लंडमध्ये नवं संकट, इंधनाच्या कमतरतेमुळे लोकांमध्ये हाणामारी

इंग्लंडमधील ९० टक्के पेट्रोल पंपांवर पेट्रोल उपलब्ध नाहीये. ज्या पेट्रोल पंपावर ते उपलब्ध आहे, तिथे गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.इंग्लंडमध्ये पेट्रोल भरण्यावरून लोकांमध्ये हाणामारीला सुरूवात झाली असून, या घटना रोखण्यासाठी तिथले पोलीस असमर्थ ठरत आहेत. यामुळे इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन चिंतेत असून त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सैन्याला पाचारण करण्याबाबत विचार करायला सुरुवात केली आहे.

    ज्या देशाने कधीकाळी जगावर राज्य गाजविले आणि जो देश जगातील सधन आणि शक्तिशाली देशांपैकी एक असल्याचा अभिमान बाळगतो अशा इंग्लंडमध्ये वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. येथे इंधन टंचाईचे न भूतो ना भविष्यतो अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. काहींना ही बातमी खोटी असल्याचं वाटेल मात्र हे सत्य आहे.

     

    इंग्लंडमधील ९० टक्के पेट्रोल पंपांवर पेट्रोल उपलब्ध नाहीये. ज्या पेट्रोल पंपावर ते उपलब्ध आहे, तिथे गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.इंग्लंडमध्ये पेट्रोल भरण्यावरून लोकांमध्ये हाणामारीला सुरूवात झाली असून, या घटना रोखण्यासाठी तिथले पोलीस असमर्थ ठरत आहेत. यामुळे इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन चिंतेत असून त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सैन्याला पाचारण करण्याबाबत विचार करायला सुरुवात केली आहे.हीच स्थिती राहिली तर संपूर्ण इंग्लंडमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. इंधन टंचाईमुळे लोकं संतापलेली असताना जर हिंसाचार वाढायला लागला तर इंग्लंडमध्ये अराजक माजण्याची शक्यता नाकारता येत नाही, यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून सैन्याला नेमण्याबाबत तिथला सरकार विचार करत आहे.

    टंचाईचे कारण?

    इंधन टंचाईला इंग्लंडमधलया विरोधकांनी आरोप केला आहे की ही परिस्थिती ब्रेक्झिटमुळे निर्माण झाली आहे. सरकारने मात्र म्हटलंय की ही परिस्थिती कोरोना महामारीमुळे निर्माण झाली असून अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी कायमस्वरुपी तोडगा काढण्याबाबत विचार सुरू आहे. मात्र खरे कारण येथे ट्रक ड्रायव्हर्सची कमतरता जबाबदार असल्याचं सांगितलं जात आहे. इंधन वाहून नेणारे टँकर चालवण्यासाठी पुरेशा प्रमाणात ट्रक ड्रायव्हर उपलब्ध नसल्याने इंधन टंचाई झाल्याचं कळतं आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी इंग्लंड सरकारने परदेशी ड्रायव्हरना तात्पुरता व्हिसा देण्याबाबत विचार सुरू केला आहे. सरकारी योजनेनुसार किमान ५ हजार विदेशी ड्रायव्हरना तात्पुरत्या स्वरुपाचा व्हिसा देण्याबाबत सरकार विचार करत असल्याचं सांगण्यात आलं आहे.