म्यानमारच्या लष्कराचा गावासह शाळेवर हल्ला; ७ मुलांसह १३ लोकांची हत्या

म्यानमार आर्मीची चार एमआय ३५ हेलिकॉप्टर गावाच्या उत्तरेला फिरत होते. त्यापैकी दोन हेलिकॉप्टर पुढे गेले. २ हेलिकॉप्टर्सने शाळेवर मशीन गन आणि अवजड शस्त्रांनी शाळेच्या मैदानात खेळणाऱ्या मुलांवर गोळीबार केला. शाळेवर हल्ला होत असल्याचे पाहून व्यवस्थापनाच्या लोकांनी विद्यार्थांना मैदानातून सुरक्षित स्थळी हलवण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.

    रंगून : म्यानमारमध्ये (Myanmar) लष्करी हुकूमशहांविरुद्ध (Military Dictator) सुरू असलेल्या जनआंदोलनाला (Mass Movement) तोंड देण्यासाठी सैन्य क्रूर (Brutal Army) पद्धती अवलंबत आहेत. आता लष्कराने गाव आणि शाळेवर हल्ला केला असून ७ मुलांसह १३ लोकांची हत्या (Murder) केली आहे. तसेच, अनेक नागरिक जखमी आहेत. म्यानमार लष्कराने केलेल्या हल्ल्यानंतर जीव वाचवण्यासाठी नागरिकांनी जंगलाकडे धाव घेतली.

    म्यानमारचे दुसरे सर्वात मोठे शहर मंडालेपासून (Mandalay) ११० किमी अंतरावर असलेल्या तबायिनच्या लेट यट कोन गावात हा हल्ला झाला. शाळेच्या प्रशासकाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी म्यानमार आर्मीची चार एमआय ३५ (Mi-35) हेलिकॉप्टर गावाच्या उत्तरेला फिरत होते. त्यापैकी दोन हेलिकॉप्टर पुढे गेले.

    २ हेलिकॉप्टर्सने शाळेवर मशीन गन आणि अवजड शस्त्रांनी शाळेच्या मैदानात खेळणाऱ्या मुलांवर गोळीबार केला. शाळेवर हल्ला होत असल्याचे पाहून व्यवस्थापनाच्या लोकांनी विद्यार्थांना मैदानातून सुरक्षित स्थळी हलवण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. म्यानमार लष्कराने केलेल्या हल्ल्यामुळे शाळेच्या इमारतीचे नुकसान झाले आहे. तसेच, सैन्याने शेजारच्या गावावरदेखील हल्ला केला. मात्र गोळ्यांचा आवाज ऐकून गावातील लोक जंगलात पळून गेले होते.