शेजारच्या महिलेला भेटण्यासाठी लढवली भन्नाट शक्कल ; पण ‘अशी’ झाली पोलखोल

महिलेला भेटण्यासाठी चक्क घराखाली भुयारी मार्ग (Under Ground)  तयार केला आहे. जेव्हा महिलेचा पती कामावर जातो. तेव्हा भुयारी मार्गाच्या माध्यमातून तिचा प्रियकर तिला भेटण्यासाठी (Meet) भुयारी मार्गाचा अवलंब करून तिच्या घरात जात होता. या भन्नाट व्यक्तीचं नाव अल्बर्टो (Alberto) असं आहे.

अनेक कपल्स (Couples) एकमेकांना भेटण्यासाठी विविध प्रकारचे कारनामे करत असतात. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरसंबंधी ( Extra marital affair) तुम्ही ऐकलंच असेल. मात्र, एका विवाहीत व्यक्तीने शेजारच्या महिलेला भेटण्यासाठी एक भन्नाट शक्कल लढवली आहे. ही घटना मेक्सिकोमध्ये (Mexico) घडली आहे.

या विवाहित व्यक्तीने महिलेला भेटण्यासाठी चक्क घराखाली भुयारी मार्ग (Under Ground)  तयार केला आहे. जेव्हा महिलेचा पती कामावर जातो. तेव्हा भुयारी मार्गाच्या माध्यमातून तिचा प्रियकर तिला भेटण्यासाठी (Meet) भुयारी मार्गाचा अवलंब करून तिच्या घरात जात होता. या भन्नाट व्यक्तीचं नाव अल्बर्टो (Alberto) असं आहे. हा मेक्सिकोच्या तिजुआना परिसरात राहतो. त्याने शेजारी महिला पामेलाच्या घरी जाण्यासाठी एक गुप्त भुयारी मार्ग तयार केला होता.

पितळ उघडं पडलं तेव्हा…

एके दिवशी जेव्हा पामेलाचा पती जॉर्ज कामाहून लवकर घरी परतला आणि त्याने पत्नीला तिच्या प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं. पतीने पाहिलं की, अल्बर्टो एका काउचच्या मागे लपला होता आणि नंतर तो गायब झाला. जॉर्जने त्याला बराचवेळ शोधलं पण तो काही सापडला नाही. परंतु जॉर्जेने संपूर्ण घराची झडती घेतली असता काउचच्या खाली एक भुयारी मार्ग दिसला. जेव्हा तो या भुयारी मार्गाने पुढे गेला तर तो थेट अल्बर्टोच्या घरी पोहोचला आणि सगळं पितळ उघडं झालं.

भुयारी मार्गाचा प्लॅन कसा केला ?

भुयारी मार्ग फार चांगल्या प्रकारे तयार करण्यात आला होता. परंतु हा मार्ग किती दिवसआधी तयार करण्यात आला होता, ही माहिती अद्यापही समोर आलेली नाहीये. परंतु जॉर्जच्या पत्नी पामेलाने त्यांच्या अफेअरबाबत अल्बर्टोच्या पत्नीला न सांगण्याची विनंती केली. परंतु या कारणामुळे दोघांमध्ये वाद झाला. हा वाद इतक्या टोकाला गेला की, पोलिसांना बोलवावं लागलं होतं.