अमेरिकेते शिक्षकाला चांगले करिअर नाही. शिक्षकांचे वार्षिक उत्पन्न हे ५० हजार डॉलर्स (३८ लाख रुपये) याहून कमी आहे. इतर स्रव क्षे६त रोजोगाराची संधी असल्याने अनेक जण इतर पर्याय स्वीकारत असल्याचे शिक्षकी पेशा सोडणारे सांगत आहेत. यातून अधिक उत्पन्न मिळवणे हाच हेतू असल्याचेही ते सांगतायेत.
वॉशिंग्टन : अमेरिका सध्या शिक्षकांच्या कमी उपलब्धतेच्या मुद्द्यावर चिंतेत आहे. लाखो शिक्षकांनी कोरोना काळानंतर नोकऱ्या सोडल्या आहेत. हे सगळेजण रियल इस्टेट एजंट, सेल्स पर्सन, सॉफ्टवेअर इंजिनिअर होण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे अमेरिकेसारख्या विकसनशील देशात शिक्षणाची समस्या येत्या काळात अधिक बिकट होण्याची शक्यता आहे. याबाबत शाळेत असलेले शिक्षक सांगतायेत की आता सगळेचजण थकले आहेत. महामारीच्या काळात मुलं ऑनलाईन शिक्षणासाठी उत्सुक दिसत नव्हते. तर आता ऑफलाईनच्या काळात मास्क घालण्याच्या अटीने अनेक ठिकाणी तणाव निर्माण होत आहेत. अशा स्थितीत शिक्षण क्षेत्रालाच रामराम करण्याचा निर्णय अनेकांनी घेतलेला दिसतोय.
सरासरी दररोज बदलत असलेले कोरोना प्रतिबंधक नियम, विद्यार्थ्यांचे दुर्ल६, पालकांच्या अपेक्षा आणि प्रशासनाच्या सूचना या सगळ्यांना संघर्ष करताकरता शिक्षक आतून नाराज झाले आहेत. २०२१ च्या आकडेवारीनुसार, इतर उद्योगांच्या तुलनेत शिक्षक पेशातील नोकरी सोडणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. २०२० साली महामारीच्या आधीच खासगी क्षेत्रातील सुमारे साडे पाच लाख अमेरिकी नागरिकांनी राजीनामे दिले आहेत. तर शिक्षण क्षेत्रातील ८ लाख जणांनी नोकरी सोडल्याची माहिती आहे.
शिक्षक पेशाचे आकर्षण संपले
अमेरिकेते शिक्षकाला चांगले करिअर नाही. शिक्षकांचे वार्षिक उत्पन्न हे ५० हजार डॉलर्स (३८ लाख रुपये) याहून कमी आहे. इतर स्रव क्षे६त रोजोगाराची संधी असल्याने अनेक जण इतर पर्याय स्वीकारत असल्याचे शिक्षकी पेशा सोडणारे सांगत आहेत. यातून अधिक उत्पन्न मिळवणे हाच हेतू असल्याचेही ते सांगतायेत.
आता माता-पित्यांवर शिक्षकांची जबाबदारी
या अडचणीच्या स्थितीत पालकांनीच मुलांचे शिक्षक व्हावे, अशी मुलांची अपेक्षा आहे. काही राज्यातील कर्मचाऱ्यांनी अंशकालीन शिक्षकी पेशा स्वीकारावा असे सांगण्यात येत आहेत.