जगावर नव्या युद्धाचे सावट :  लवकरच रशिया युक्रेन हल्ला करण्याची शक्यता, रशियाचे सैनिक आणि हत्यारे सज्ज असल्याची अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांची माहिती

अमेरिकेने आपल्या नाटो देशांना गुप्तचर माहिती आणि नकाशे उपलब्ध करुन दिले आहेत. यातून हे स्पष्ट होते आहे की, रशियन राष्ट्रपती ब्लादिमिर पुतिन यांचे इरादे युक्रेनवर हल्ला करण्याचे आहेत. पुढच्या वर्षी पुतिन हे आदेश देण्याची शक्यता आहे.

  वॉशिंग्ट्न : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या तणावपूर्व स्थितीची परिणिती युद्धात होण्याची शक्यता आहे. लवकरच रशिया, युक्रेनवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती, अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने दिली आहे. यासाठी रशियाने मोठ्या प्रमाणात तयारी केल्याचीही माहिती आहे.

  रशियन सेना वेगवेगळ्या ठिकाणांवरुन युक्रेनवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. अमेरिककडून हा अहवाल याच महिन्यात दुसऱ्यांदा आला आहे. यापूर्वी जेव्हा हा रिपोर्ट आला होता तेव्हा रशियाने हा दावा अमान्य करत, अमेरिका जाणीवपूर्वक चुकीची विधाने करत असल्याचा आरोप रशियाने केला होता.

  नाटो देशांना दिला इशारा
  अमेरिकेने आपल्या नाटो देशांना गुप्तचर माहिती आणि नकाशे उपलब्ध करुन दिले आहेत. यातून हे स्पष्ट होते आहे की, रशियन राष्ट्रपती ब्लादिमिर पुतिन यांचे इरादे युक्रेनवर हल्ला करण्याचे आहेत. पुढच्या वर्षी पुतिन हे आदेश देण्याची शक्यता आहे.

  वेगवेगळ्या ठिकाणांवरुन होऊ शकतात हल्ले
  वेगवेगळ्या ठिकाणांवरुन युक्रेनवर हल्ला करण्यात यावेत, अशी पुतिन यांची इच्छा आहे. या सैन्याच्या तुकड्या क्रीमिया, रशिया आणि बेलारुसच्या मार्गाने हल्ला करण्याची शक्यता आहे. या हल्ल्यासाठी एक लाख सैनिकांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. युक्रेनमधील बर्फाळ प्रदेशातील परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेसही तुकड्यांना देण्यात आले आहेत.

  पुतीन यांचा इन्कार
  गेल्या आठवड्यात युक्रेनवर हल्ला करण्याची चर्चा, ब्लादिमिर पुतीन यांनी फेटाळली होती. रशियन सेनेचा असा कोणताही विचार नसल्याचे पुतिन यांनी सांगितले होते. अमेरिका आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पुतिन यांनी इशारा दिला होता की, त्यांच्याविरोधात कठोर पावले उचलण्यास रशियाला प्रवृत्त करु नका. पुतिन यांच्या मनात नेमकं काय सुरु हे, याचा अंदाज आत्तापर्यंत आलेला नाही.

  या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री एंटनी ब्लिंकन यांनी म्हटले होते की, रशियन सैन्यांच्या हाचलचालींबाबत आम्हाला शंका आहे. मात्र पुतिन यांचे इरादे काय आहेत, याबबात तूर्तास तरी आम्हाला माहिती नाही. जुना इतिहास पाहता, रशिया धोकादायक पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याचे मात्र स्पष्ट आहे.