न्यूझीलंडमध्ये सुरू झाले नवीन वर्षाचे सेलिब्रेशन, पाहा कशी झाली सुरुवात

ऑस्ट्रेलियाची राजधानी सिडनीमध्ये नववर्षाचं जोरदार स्वागत करण्यात आलं. सुप्रसिद्ध सिडनी हार्बर ब्रिजवर यावेळी मोठी गर्दी जमली होती. मात्र कोरोनाचे निकष पाळत नागरिकांनी उत्साहानं नव्या वर्षाचं स्वागत केलं.

    नवी दिल्ली – न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात 2022 या नव्या वर्षाला (New Year) सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियन नागरिकांनी मोठ्या जल्लोषात नव्या वर्षाचं स्वागत केलं. जगात सर्वात पहिल्यांदा नव्या वर्षांचं स्वागत केलं जातं न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात. दरवर्षी जगभरातील सेलिब्रेशनपैकी ऑस्ट्रेलिातील नववर्षाचं स्वागत, हे पूर्ण जगाचं आकर्षण असतं, कारण ते सर्वप्रथम होतं.

    ऑस्ट्रेलियाची राजधानी सिडनीमध्ये नववर्षाचं जोरदार स्वागत करण्यात आलं. सुप्रसिद्ध सिडनी हार्बर ब्रिजवर यावेळी मोठी गर्दी जमली होती. मात्र कोरोनाचे निकष पाळत नागरिकांनी उत्साहानं नव्या वर्षाचं स्वागत केलं. स्काय टॉवरवर लावलेल्या भल्यामोठ्या घड्याळाकडे सर्वांचं लक्ष असतं. दरवर्षी हे घड्याळ सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतं. या घड्याळात बारा वाजले की जोरदार आतषबाजी आणि सेलिब्रेशनला सुरुवात होते.