अमेरिकेत ‘बूट आख्यान’ सुरू, मानवी रक्ताचा बूट, सैतानाची संकल्पना आणि Nike ची केस !

अमेरिकतल्या ब्रुकलीनमध्ये MSCHF फ्रँक या कंपनीने एक अनोख्या प्रकारचे शूज म्हणजेच बूट तयार केले. सॅटन शूज असं या बुटांचं नाव. हे बूट तयार करताना मानवी रक्ताचा त्यात उपयोग करण्यात आल्याचं कंपनीनं जाहीर केलं. ग्रॅमी पुरस्कार विजेता अमेरिकन रॅपर लिल नास एक्स यानं या बुटांचं प्रमोशन केलं आणि आपल्याला एक लकी म्हणजेच ६६६ नंबरचा बूट मिळाल्याचं जाहीर केल.

    व्यवसायात प्रगती करण्यासाठी कुणाच्या डोक्यात काय कल्पना येईल आणि त्याचा तो कसा वापर करेल, याचा काही भरवसा नाही. अमेरिकेत सध्या एका बुटावरून मोठं महाभारत सुरू झालंय. या बुटात मानवी रक्ताचा वापर केल्यामुळे या प्रकरणाचा धार्मिक फोडणी पण मिळालीय.

    अमेरिकतल्या ब्रुकलीनमध्ये MSCHF फ्रँक या कंपनीने एक अनोख्या प्रकारचे शूज म्हणजेच बूट तयार केले. सॅटन शूज असं या बुटांचं नाव. हे बूट तयार करताना मानवी रक्ताचा त्यात उपयोग करण्यात आल्याचं कंपनीनं जाहीर केलं. ग्रॅमी पुरस्कार विजेता अमेरिकन रॅपर लिल नास एक्स यानं या बुटांचं प्रमोशन केलं आणि आपल्याला एक लकी म्हणजेच ६६६ नंबरचा बूट मिळाल्याचं जाहीर केल. मात्र सॅटन शूज तयार करताना Nike कंपनीची कुठलीही परवानगी MSCHF कंपनीनं घेतली नसल्याचं स्पष्ट झालं. हे समजल्यावर NIKE कंपनीने कोर्टात धाव घेतलीय.

    सॅटन म्हणजे काय रे भाऊ?

    ख्रिश्चन, ज्यू आणि मुस्लिम या धर्मांमध्ये सॅटन म्हणजे दैत्य किंवा राक्षस. तिन्ही धर्मांमध्ये याची नावं वेगवेगळी असली तरी संकल्पना तीच आहे. ही सैतान प्रवृत्ती म्हणजेच सॅटन रक्तपिपासू असते, असं मानलं जातं. त्यामुळंच मानवी रक्ताचा वापर करून तयार करण्यात आलेल्या बुटांना एक धार्मिक अधिष्ठान प्राप्त करून देण्याचा प्रयत्न कंपनीनं केला. त्यामुळे या कंपनीने लाखो बूट रातोरात विकले गेले.

    दरम्यान, सैतान अशी थिम घेऊन NIKE कंपनीने अगोदरच बूट बनवलेला असल्यामुळे हा आपल्या ट्रेडमार्क कायद्याचा भंग असल्याचं NIKE नं म्हटलंय.