गोळीबाराने पुन्हा हादरली अमेरिका! कॅलिफोर्निया-आयोवा मध्ये दोन घटनेत नऊ जणांचा मृत्यू, विद्यार्थ्यांचाही समावेश

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये दोन दिवसांत गोळीबाराच्या दोन मोठ्या घटना समोर आल्या आहेत

  दोन दिवसापुर्वी अमेरिकेतील (America) कॅलिफोर्नियामध्ये (California) एका क्लबमध्ये चिनीवर्ष साजऱ्या करणाऱ्यांवर  गोळीबार करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्ह त्याच कॅलिफोर्निया राज्यात गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे तर, आयोवा (Iowa) राज्यातही एका शाळेत गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत दोघांना आपला जीव गमवावा लागला, तर एक जण जखमी झाला आहे.

  कॅलिफोर्नियात पुन्हा गोळीबार

  अमोरकेत गेल्या दोन दिवसांत गोळीबाराच्या दोन मोठ्या घटना समोर आल्या आहेत. कॅलिफोर्नियामध्ये दोन दिवसांतील ही गोळीबाराच्या दुसरी घटना आहे. स्थानिक वेळेनुसार सोमवारी संध्याकाळी हाफ मून बे भागात गोळीबाराची घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. तर सात जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे.

  आयोवा मध्ये काय झाले?

  अमेरिकेतील आयोवा राज्यातील डेस मोइनेस येथील शाळेत झालेल्या गोळीबारात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून एक शिक्षक जखमी झाला आहे. पोलिसांनी अनेक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. जखमी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला अमेरिकन मीडियानुसार, गोळीबाराची घटना सोमवारी दुपारी डेस मोइनेस आयोवा चार्टर स्कूलमध्ये घडली. गोळीबारात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत तीन जण जखमी झाले असून एकावर उपचार सुरू आहेत. तिसरी व्यक्ती ज्याला गोळ्या लागल्या आहेत, तो शाळेतील शिक्षक असून त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे.

  दोघांना ताब्यात घेतले

  मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोळीबारानंतर काही वेळातच घटनास्थळापासून सुमारे दोन मैल दूर असलेल्या तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून कारही जप्त करण्यात आली आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप आरोपींची नावे जाहीर केलेली नाहीत.