नो टेन्शन! दोन वेगवेगळ्या लसी घेतल्या असतील तर घाबरू नका ; डब्ल्यूएचओने दिली चांगली बातमी, म्हणाले..

इतर काही देशांच्या आणि फार्मा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी कोरोना विषाणूच्या प्रकारांसाठी बूस्टर शॉट्स तयार करण्यास सुरवात केली आहे. तसेच ,आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, आता याची गरज आहे की नाही हे सांगणे फार कठीण आहे. स्वामीनाथन म्हणाले की, आम्हाला याबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही. हे सर्व प्राथमिक अवस्थेत आहे. कारण अद्याप बऱ्याच देशात कोरोना लसीकरण सुरु झालेले नाही.

    स्टॉकहोम : जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दोन वेगळ्या कोरोना लसी बसविण्याबद्दल एक चांगली बातमी दिली आहे. डब्ल्यूएचओचे मुख्य संशोधक सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटले आहे की, दोन वेगवेगळ्या कंपन्यांची लस दिली गेली असल्यास घाबरण्याचे काही कारण नाही. यामुळे उलट कोरोना विषाणूविरूद्ध प्रभावीपणे कार्य करण्यास मदत होणार आहे.

    स्वामीनाथन म्हणाले, ‘आता अनेक देश लसीकरणासाठी दुसरी कोणतीही एक लस वापरू शकतात.’ यापूर्वी, बर्‍याच शास्त्रज्ञांनी असे सुचवले होते की, कोरोनाच्या नवीन स्ट्रेनला आटोक्यात आणण्यासाठी दोन वेगवेगळ्या कंपन्यांच्या कोरोना लस देण्यात याव्यात. नवीन स्ट्रेनविरोधात आणि दीर्घ प्रतिकारशक्तीसाठी हे दोन लसी अधिक संरक्षण प्रदान करतील. मात्र त्यांनी हे हि नमूद केले आहे की, ब्रिटन, स्पेन आणि जर्मनीमधील आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की दोन वेगवेगळ्या लशी घेतल्यानंतर रूग्णांना जास्त वेदना, ताप आणि इतर दुष्परिणाम होत आहेत.

    ‘इम्यून सिस्टम वेगवेगळ्या लसींना अधिक प्रतिसाद देणारी आहे’
    डब्ल्यूएचओ शास्त्रज्ञाने असेही म्हटले आहे की, दोन वेगवेगळ्या कंपन्यांवरील लसी जास्त रोगप्रतिकारक क्षमता देणारी ठरत आहे. कोरोना विषाणूमुळे प्रभावित झालेल्या पेशी नष्ट करणार्‍या अँटीबॉडीज आणि पांढऱ्या रक्त पेशी जास्त प्रमाणात तयार होण्यास यामुळे मदत होत आहे. दरम्यान, जगातील अनेक देशांमध्ये लसीकरण वेगाने करण्यासाठी दोन वेगवेगळ्या लसी घेण्याची चाचणी घेण्यात येत आहे. मलेशियामध्ये कोविशिल्ड आणि फायझरची लस एकामागोमाग एक देण्याचा विचार केला जात आहे.

    दरम्यान, इतर काही देशांच्या आणि फार्मा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी कोरोना विषाणूच्या प्रकारांसाठी बूस्टर शॉट्स तयार करण्यास सुरवात केली आहे. तसेच ,आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, आता याची गरज आहे की नाही हे सांगणे फार कठीण आहे. स्वामीनाथन म्हणाले की, आम्हाला याबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही. हे सर्व प्राथमिक अवस्थेत आहे. कारण अद्याप बऱ्याच देशात कोरोना लसीकरण सुरु झालेले नाही. मात्र ब्रिटनने म्हटले होते की, या साथीचा प्रसार रोखण्यासाठी ब्रिटनमध्ये थंडीच्या आधी कोरोना लसीचा बूस्टर शॉट लागू केला जाईल.