kim jong un

उत्तर कोरियाचा(north korea) सर्वेसर्वा किम जोंग उन(kim jong un gave odd punishment) त्याच्या क्रूरतेसाठी आणि विक्षिप्त वागण्यासाठी प्रसिद्ध आहे. आता त्याच्या अशाच एका क्रूरतेची चर्चा जगभरात होत आहे.

    प्योंगयांग: उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किम जोंग उन(kim jong un gave odd punishment) त्याच्या क्रूरतेसाठी आणि विक्षिप्त वागण्यासाठी प्रसिद्ध आहे. आता त्याच्या अशाच एका क्रूरतेची चर्चा जगभरात होत आहे.

    उत्तर कोरियात पॉर्न बघणे हा मोठा गुन्हा आहे. त्यासाठी या देशात कडक शिक्षा दिली जाते. काही दिवसांपूर्वी या देशात एका अल्पवयीन मुलाला पॉर्न फिल्म बघत असताना काही अधिकाऱ्यांनी पकडले. त्यानंतर त्या मुलाला व त्याच्या कुटुंबियांना थेट उत्तर कोरियातील एका उजाड आणि रखरखीत भागात पाठविण्यात आले आहे. त्यांनी कायमचे त्याच भागात राहायचे असे आदेश देण्यात आले आहेत. या मुलाचे कुटुंब असे एकाएकी बेघर झाल्याने त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जात आहेत. अशा विचित्र शिक्षेमुळे किम जोंग उन पुन्हा लोकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.