उत्तर कोरियाचे हुकहमशहा किम जोंग उन हे नेहमीच त्यांच्या विक्षिप्त स्वभावाबद्दल चर्चेत असतात. त्याचेच एक उदाहरण पुढे आले आहे. उत्तर कोरियात बंदी घातलेला एक सिनेमा 5 मिनिटांसाठी बघितल्यामुळे एका मुलाला 14 वर्षांची सक्तमजूरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे(North Korean dictator Kim Jong Un re-discusses; Just watching a five minute movie gave a boy a terrible punishment).

    प्योंगयोंग : उत्तर कोरियाचे हुकहमशहा किम जोंग उन हे नेहमीच त्यांच्या विक्षिप्त स्वभावाबद्दल चर्चेत असतात. त्याचेच एक उदाहरण पुढे आले आहे. उत्तर कोरियात बंदी घातलेला एक सिनेमा 5 मिनिटांसाठी बघितल्यामुळे एका मुलाला 14 वर्षांची सक्तमजूरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे(North Korean dictator Kim Jong Un re-discusses; Just watching a five minute movie gave a boy a terrible punishment).

    या मुलाला 7 नोव्हेंबरला हडसन शहरातील शाळेतून अटक करण्यात आली होती. ‘द अंकल’ नावाचा रहस्यमय गूढ सिनेमा त्याने 5 मिनिटांसाठी बघितला होता. हा सिनेमा दक्षिण कोरियातील असल्यामुळे उत्तर कोरियात यावर बंदी घातली गेली आहे. पूर्वी पोर्न सिनेमा बघितल्याबद्दल एका मुलाच्या पालकांना तुरुंगवासाची शिक्षाही सुनावली गेली होती.

    उत्तर कोरियामध्ये सांस्कृतिक गुन्हा करणाऱ्यांना कठोर शिक्षेला सामोरे जावे लागते. अशा व्यक्तीवर 2 लाख रुपयांचा दंडही आकारला जातो. जर हा गुन्हा करणारी व्यक्ती 5 ते 15 वर्षांची असेल तर कठोर परिश्रमांची शिक्षा भोगायला लागते.