अमेरिकेत गोळीबाराचं सत्र थांबेना! आता वॉशिंग्टनमधील याकिमा येथे अज्ञाताचा 21 लोकांवर गोळीबार, तीन जणांचा मृत्यू

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, बंदुकधारी व्यक्तीने एका दुकानात अचानक 21 जणांवर गोळ्या झाडल्या. हल्ल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला.

    अमेरिका : अमेरिकेत गोळीबार आणि हत्येच्या (Firing In America) घटना थांबण्याच नाव घेत नाही आहे. काल अमेरिकेतील कॅलिफोर्निया (California) आणि आयोवा (Iowa)  दोन राज्यात गोळबाराच्या घटना घडल्या होत्या. या घटनेत एकूण 11 जणांचा मृत्यू झाला होता. आता वॉशिंग्टन राज्यातील याकिमा शहरातील एका सुविधा स्टोअरमध्ये झालेल्या गोळीबारात किमान तीन जण ठार झाले आहेत.

    कुठे घडली घटना

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंदुकधारी व्यक्तीने एका दुकानात अचानक 21 जणांवर गोळ्या झाडल्या. हल्ल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला. याकिमा पोलिस विभागाला घटनास्थळी येत दुकानाबाहेर आणि आतून तीन जणांचे मृतदेह बाहेर काढले. याकिमा हे वॉशिंग्टनमधील अंदाजे ९६,००० लोकसंख्या असलेले शहर आहे. काल कॅलिफोर्नियामधील हाफ मून बे परिसरात दोन गोळीबार झाल्याच्या काही तासांनंतर मंगळवारी ही दुःखद घटना घडली

    काल दोन राज्यात गोळीबाराच्या घटना

    कालच अमोरकेत गोळीबाराच्या दोन मोठ्या घटना घडल्या कॅलिफोर्नियामध्ये सोमवारी संध्याकाळी हाफ मून बे भागात गोळीबाराची घटना घडली. या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला तर,आयोवा राज्यातील डेस मोइनेस येथील शाळेत झालेल्या गोळीबारात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून एक शिक्षक जखमी झाला आहे.