आता पाकिस्तानात पोहोचले ‘बुलडोझर राजकारण’! इम्रान खानच्या रॅलीच्या ठिकाणी शाहबाज शरीफ यांची कारवाई

वृत्तानुसार, जेव्हा पोलिस रॅलीची तयारी थांबवण्यासाठी संबंधित भागात पोहोचले तेव्हा इम्रान खानच्या पक्षाशी संबंधित लोकांनी आंदोलन केले. हे प्रकरण वाढत असताना पोलिसांनी आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीमार केला. यानंतर आता इम्रान खान यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, आज ते सियालकोटला जात आहेत.

  नवी दिल्ली – अविश्वास ठराव मंजूर करून सत्ता गमावल्यानंतर इम्रान खान संतापले आहेत. आता पोलिसांनी काही केले तरी ते आज सियालकोटला जात असल्याचे त्याने म्हटले आहे. सियालकोटमध्ये इम्रान खानची रॅली ख्रिश्चन समुदायाशी संबधित अशा ठिकाणी आहे आणि त्यावरून वाद सुरू असल्याचे डॉनच्या वृत्तात म्हटले आहे. पोलिसांनी पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफच्या कार्यकर्त्यांना संबंधित परिसरात रॅलीच्या तयारीपासून रोखल्याने प्रकरण आणखी चिघळले आहे.

  पोलिसांनी इम्रानच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार
  वृत्तानुसार, जेव्हा पोलिस रॅलीची तयारी थांबवण्यासाठी संबंधित भागात पोहोचले तेव्हा इम्रान खानच्या पक्षाशी संबंधित लोकांनी आंदोलन केले. हे प्रकरण वाढत असताना पोलिसांनी आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीमार केला. यानंतर आता इम्रान खान यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, आज ते सियालकोटला जात आहेत.

  इम्रान खान शाहबाज सरकारवर भडकले
  सियालकोटमध्ये सरकारने जे केले ते संतापजनक असले तरी अनपेक्षित नाही, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे. जामिनावर सुटलेले गुन्हेगार आणि लंडनमधील दोषी माफिया बॉस यांनी सत्तेत असताना विरोधकांविरुद्ध नेहमीच फॅसिस्ट डावपेच वापरले आहेत. ते विरोधात असताना लोकशाहीचा गैरवापर करतात आणि सत्तेत असताना सर्व लोकशाही रूढी पूर्णपणे नष्ट करतात.

  मेळाव्याच्या ठिकाणाबाबत काय आहे वाद ?
  डॉनच्या वृत्तानुसार, सियालकोटचे जिल्हा पोलीस अधिकारी हसन इक्बाल यांनी मीडियाला सांगितले की, स्थानिक ख्रिश्चन समुदायाने मैदानावरील रॅलीवर आक्षेप घेत ही त्यांची मालमत्ता असल्याचे म्हटले आहे. याठिकाणी राजकीय मेळावा होता कामा नये, अशी याचिका त्यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. हायकोर्टाने सियालकोटच्या उपायुक्तांना दोन्ही बाजू ऐकून त्यानुसार निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते.