लोकसंख्या वाढवण्यासाठी चीनचा भलताच निर्णय, आता लग्न न करताही मुलं जन्माला घालण्यासाठी देतायेत प्रोत्सहान

2019 पर्यंत, केवळ विवाहित लोकांनाच कायदेशीररित्या मुले जन्माला घालण्याची परवानगी होती. पण आता नवीन नियमामुळे लोकांना लग्न न करताही मुले होऊ शकणार आहेत. चीनमध्ये जन्मदर आणि विवाह दरात लक्षणीय घट झाली असून, त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे.

    नवी दिल्ली – चीनची लोकसंख्या सातत्याने कमी होत आहे. विशेषत: मुलांच्या संख्येत सातत्याने घट होत असून त्याबाबत चीनने गेल्या काही काळात अनेक पावले उचलली आहेत. चीनने 2 मुलांची सक्ती रद्द करून ती 3 वर आणली, त्यानंतरही लोक मुले जन्माला घालण्यास टाळाटाळ करत आहेत. आता चीनने एक मोठा निर्णय घेतला आहे ज्यामध्ये जोडप्यांना लग्नाशिवाय देखील मुले जन्माला घालू शकतात आणि त्यांना देखील तेच फायदे मिळतील जे विवाहित जोडप्यांना मुले असताना मिळतात.

    चीनमध्ये जन्मदर आणि विवाह दरात लक्षणीय घट
    2019 पर्यंत, केवळ विवाहित लोकांनाच कायदेशीररित्या मुले जन्माला घालण्याची परवानगी होती. पण आता नवीन नियमामुळे लोकांना लग्न न करताही मुले होऊ शकणार आहेत. चीनमध्ये जन्मदर आणि विवाह दरात लक्षणीय घट झाली असून, त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे.

    नियम 15 फेब्रुवारीपासून लागू होणार
    हा नियम सध्या देशाच्या नैऋत्य राज्य सिचुआनमध्ये 15 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. तथापि, जर एखाद्या जोडप्याला मूल व्हायचे असेल तर त्यांनी प्रथम सिचुआन सरकारकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. विशेष बाब म्हणजे नोंदणीनंतर अविवाहित जोडप्यांना मातृत्व विमाही मिळणार आहे. विवाहित महिला आणि पुरुषांप्रमाणेच अविवाहित जोडप्यांनाही प्रसूती रजा मिळणार आहे. यासोबतच महिलेला रजेदरम्यान पूर्ण पगारही दिला जाणार आहे.

    सिचुआनच्या आरोग्य आयोगाने एक निवेदन जारी केले की लोकसंख्या वाढीस चालना देण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. सरतेशेवटी, वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर चीनने पहिल्यांदा 1980 मध्ये एक मूल हे धोरण लागू केले होते. या काळात जन्मदरात मोठी घट झाली. त्यानंतर 2015 मध्ये हे धोरण रद्द करण्यात आले.