लठ्ठ पुरुषांना ‘या देशात लग्नासाठी आहे सर्वाधिक मागणी

स्पर्धा जिंकण्यासाठी इथले पुरुष सहा महिने आधीपासूनच तयारी सुरू करतात. जास्तीत जास्त लठ्ठ होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. गायीचं रक्त आणि दूध एकत्र करून पिणं इथं उत्तम मानलं जातं. यामुळे आजार पसरण्याचाही धोका असतो. पण हे पुरुष न भीता असं दूध पितात.

    अदिस अबाबा: लग्नासाठी जोडीदार निवडताना सर्वसाधारणपणे मुलींची मुलगाकिंवा होणार नवरा हा हँडसम, सिक्स पॅक, गोरा असावा अशी अपेक्षा असते. किंबहुना अश्या मुलांना मुली आपला पसंती दर्शवतात. पण इथोपियातील येथील ओमो व्हॅलीत (Omo Valley) राहणारे बोदी आदिवासींमध्ये दरवर्षी लठ्ठपणाबाबत (Fattest Man Competition) एक स्पर्धा होते. या स्पर्धेत जो जिंकतो, त्याला सर्वात हँडसम मानलं जातं. मग त्याच्याशी लग्न करण्यासाठी तरुणींची भांडणंही होतात.

    तरुणींना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी पुरुषांकडे ही एकमेवर संधी असते. त्यामुळे ही स्पर्धा जिंकण्यासाठी इथले पुरुष सहा महिने आधीपासूनच तयारी सुरू करतात. जास्तीत जास्त लठ्ठ होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. गायीचं रक्त आणि दूध एकत्र करून पिणं इथं उत्तम मानलं जातं. यामुळे आजार पसरण्याचाही धोका असतो. पण हे पुरुष न भीता असं दूध पितात. त्यापैकी काही पुरुष हे दूध पिऊ शकतात तर काहींना असं दूध पिताच उलटी होते.
    यामुळे पोट आणि शरीराच्या इतर भागात लवकर चरबी साठते. शिवाय ते सहा महिने एका वेगळ्या झोपडीत राहतात. त्यांना सेक्स करण्याची परवानगी नसते. 6 महिन्यांनंतर स्पर्धेसाठी हे पुरुष आपल्या वजनदार शरीरासह सर्वांसमोर येतात. जो जितका लठ्ठ तितका हँडसम. त्याला हिरो म्हटलं जातं.