रशिया-युक्रेन युद्धाला एक वर्ष पुर्ण! दिसेल त्या गोष्टीवर ताबा मिळवत सुटला रशिया, युक्रेनने धैर्याने 6 हजार चौ.किमी क्षेत्र सोडवलं

९० लाख कोटी रु.च्या इमारती, रस्ते आणि रेल्वे रुळ नष्ट झाल्यानंतरही युक्रेन राजधानी कीव्ह वाचवण्यात यशस्वी राहिले. उत्तर भागातून ६ हजार चौ.किमी जमीन रशियन ताब्यातून मुक्त करण्यात आला आहे.

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाला (Ukraine Russia War )एक वर्ष पूर्ण झाले आहे. 24 फेब्रुवारी 2022 रोजी सुरू झालेल्या या भीषण युद्धाने युक्रेन या सुंदर देशाला उद्ध्वस्त केले आहे. अमेरिकेसह अनेक पाश्चिमात्य देश या युद्धासाठी रशियाला जबाबदार धरत आहेत. दोन देशांमधील युद्ध एका वर्षानंतरही सुरू आहे, ज्यात हजारो नागरिकांचे प्राण गेले आहेत आणि लाखो लोक बेघर झाले आहेत. मिळेल त्या गोष्टीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करण्याऱ्या रशियानं युक्रेनमधे अक्षरश:  उद्छाद मांडला होता. शाळा रुग्णालय, शासकीय इमारतींना लक्ष्य करण्यात आले. वर्षभरापासून रशिया युक्रेनवर हल्ला करत आहे, पण झेलेन्स्कीने ना गुडघे टेकले ना देशातील जनतेला नतमस्तक होऊ दिले. देशाचा काही भाग रशियाच्या तावडीतुन सोडवण्यात युक्रेनला यश मिळालयं.

24 फेब्रुवारी 2022 युध्दाला सुरुवात

23 फेब्रुवारी 2022 च्या रात्री रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा केली. काही तासांनंतर म्हणजेच 24 फेब्रुवारीच्या पहाटे युक्रेनची राजधानी कीव आणि आसपासच्या शहरांमध्ये अचानक हवाई हल्ले सुरू झाले. रशियाने युक्रेनवर आक्रमण केले. कधी मुलांच्या शाळांवर क्षेपणास्त्र डागण्यात आले तर कधी रुग्णालयांना लक्ष्य करण्यात आले. काय हल्ले मुले. काय म्हातारा माणूस रशियाने गर्भवती महिलांनाही सोडले नाही.

युक्रेनचा रशियात विध्वंस

दुसऱ्या महायुद्धाच्या ७६ वर्षांनंतर युरोपची भूमी रोज रक्तबंबाळ होत आहे. रशियन हल्ल्यामुळे युक्रेनची लाखो एकर शेती स्फोटकांनी पांघरली आहे. उद्योग-धंदे उद्‌ध्वस्त झाले. अमेरिका सारख्या बलाढ्य देशांनी मोठ्या युद्धशक्ती पैसा आणि शस्त्र पुरवण्यापेक्षा जास्त काही करू शकल्या नाहीत. युक्रेनच्या पूर्व भागातील तीन प्रमुख शहरे आता रशियाच्या कब्जात आहेत. ९० लाख कोटी रु.च्या इमारती, रस्ते आणि रेल्वे रुळ नष्ट झाल्यानंतरही युक्रेन राजधानी कीव्ह वाचवण्यात यशस्वी राहिले. उत्तर भागातून ६ हजार चौ.किमी जमीन रशियन ताब्यातून मुक्त करण्यात आला आहे. या युद्धाचा परिणाम केवळ युक्रेनवर नव्हे तर संपूर्ण जगावर पडला. जगात महागाईने सर्व विक्रम मोडीत काढले. भारतावरही परिणाम झाला.

रिअल इस्टेटची ४१ हजार चौ.मीटर जागा नष्ट

{रशियन हल्ल्यात ११ एअरेबस, १८ एअरपोर्ट, २ बंदरे नष्ट झाली. १४०० पेक्षा जास्त सरकार-खासगी इमारती जमीनदोस्त झाल्या. ४१ हजार चौ. मीटर जागा नष्ट. २७ हजार किमी रस्ते नष्ट झाले.

९७ लाखांपेक्षा जास्त युक्रेनी निर्वासित झाले

{हल्ल्यानंतर १.८८ कोटींपेक्षा जास्त लोकांनी युक्रेन साडेले होते. २ महिन्यानंतर लोक परतू लागले. संयुक्त राष्ट्र निर्वासित विभागानुसार,अद्याप ९७ लाखांपेक्षा जास्त युक्रेनी पोलंडसह अन्य देशांत राहत आहेत.