‘

ब्रिटनची गुप्तचर संस्था एमआय5 ने एक मोठा दावा केला आहे. हा दावा युकेच्या एका खासदाराशी संबंधित आहे. मात्र, यामुळे भारत सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची देखील शक्यता आहे. एमआय5 ने ब्रिटनच्या लेबर पार्टीचे खासदार बॅरी गार्डिनर हे चिनी एजंट असल्याचा आरोप केला आहे(Padma Shri from India to Chinese agent; Britain's intelligence service claims).

  लंडन : ब्रिटनची गुप्तचर संस्था एमआय5 ने एक मोठा दावा केला आहे. हा दावा युकेच्या एका खासदाराशी संबंधित आहे. मात्र, यामुळे भारत सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची देखील शक्यता आहे. एमआय5 ने ब्रिटनच्या लेबर पार्टीचे खासदार बॅरी गार्डिनर हे चिनी एजंट असल्याचा आरोप केला आहे(Padma Shri from India to Chinese agent; Britain’s intelligence service claims).

  भारतासाठी महत्त्वाची बाब म्हणजे जानेवारी-2020 मध्ये नरेंद्र मोदी सरकारने बॅरी गार्डनर यांना पद्मश्री देऊन सन्मानित करण्याची घोषणा केली आहे. एमआय5 आरोप केला आहे की, बॅरी गार्डिनर यांनी ब्रिटनमधील लोकशाही प्रक्रियेला बाधा आणण्यासाठी चीनकडून पैसे घेतले. या कामासाठी चीनच्या क्रिस्टीन चिंग कुई ली या लॉ फर्ममार्फत गार्डिनरच्या कार्यालयात बराच काळ पैसे पाठवले जात होते.

  क्रिस्टीनच्या फर्मची लंडन आणि बर्मिंगहॅममध्येही कार्यालये आहेत. त्यांची फर्म लंडनमधील चिनी दूतावासात कायदेशीर सल्लागार म्हणूनही काम करते. एवढेच नाही तर बॅरी गार्डनरने क्रिस्टीनचा मुलगा डॅनियल विल्कीस यालाही त्यांच्या ऑफिसमध्ये नोकरी दिली होती. मात्र, एमआय5 चा खुलासा झाल्यानंतर डॅनियलने राजीनामा दिला.

  काय आहे क्रिस्टीन?

  एमआय5 नुसार क्रिस्टीन ही एक चिनी गुप्तहेर आहे. ती चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या युनायटेड फ्रंट वर्क डिपार्टमेंटसाठी (युएफडब्ल्युडी) काम करते. युएफडब्ल्युडीच्या आदेशानुसार, ती ब्रिटनमध्ये राजकीय हस्तक्षेप आणि अस्थिरता निर्माण करण्याचे काम करते. चीनच्या हिताची धोरणे आणि निर्णय प्रभावित करण्याचा प्रयत्न करते. युएफडब्ल्युडीनुसार, बॅरी गार्डिनर हे एकमेव नाही ज्याने चीनकडून पैसे घेतले. क्रिस्टीनने त्यांच्या लॉ फर्मद्वारे इतर पक्षांना आणि त्यांच्या खासदारांनाही निधी उपलब्ध करून दिला आहे. या दाव्यासोबतच गुप्तचर संस्थेने सर्व पक्ष आणि खासदारांना चिनी हस्तक्षेपाविरोधात इशाराही दिला आहे.

  हे सुद्धा वाचा
  • 2022