पाकिस्तानने पुन्हा चीनपुढे हात पसरले, केली कर्जाची मागणी

स्थानिक माध्यमांतील बातम्यांनुसार १३ डिसेंबर रोजी चीन आणि पाकिस्नातच्या संयुक्त आर्थिक समितीची बैठक झाली. या बैठकीत पाकिस्तान घेत असलेल्या कर्जाबाबत अधिकची गॅरंटी द्यावी, अशी मागणी चीनकडून करण्यात आली. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार चीननं अतिरिक्त हमीसाठीची कागदपत्रं जमा करण्याची मागणी केली. मात्र पाकिस्तानकडून अशी कुठलीही अतिरिक्त हमी दिली गेली नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय.

पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या डबघाईला आलीय. चीन पाकिस्तानला एका रेल्वे योजनेसाठी कर्ज देण्याच्या तयारीत आहे. मात्र या कर्जाला मंजुरी देण्याअगोदर पाकिस्ताननं चीनकडं अतिरिक्त हमी देण्याची मागणी केलीय. पाकिस्तानकडून कर्जाची परतफेड होईल, यावर आता चीनचा विश्वास उरला नसल्याचंच हे लक्षण आहे.

स्थानिक माध्यमांतील बातम्यांनुसार १३ डिसेंबर रोजी चीन आणि पाकिस्नातच्या संयुक्त आर्थिक समितीची बैठक झाली. या बैठकीत पाकिस्तान घेत असलेल्या कर्जाबाबत अधिकची गॅरंटी द्यावी, अशी मागणी चीनकडून करण्यात आली. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार चीननं अतिरिक्त हमीसाठीची कागदपत्रं जमा करण्याची मागणी केली. मात्र पाकिस्तानकडून अशी कुठलीही अतिरिक्त हमी दिली गेली नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय.

पाकिस्तानकडून कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे कर्जाच्या या व्यवहारावर स्वाक्षऱ्या होऊ शकल्या नाहीत. पेशावर ते कराचीदरम्यान रेल्वे ट्रॅकच्या दुपदरीकरण प्रकल्पासाठी चीनकडून पाकिस्तानला अर्थपुरवठा केला जाणार आहे. मात्र सध्या तरी चीननं हा व्यवहार रोखून धरल्याची चर्चा आहे. पाकिस्तानसाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

पाकिस्तानी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्ताननं याअगोदर कर्जासाठी जी-२० राष्ट्रांकडे कर्जाची विचारणा केली होती. त्यामुळेच चीननं अतिरिक्त हमीची मागणी केल्याची चर्चा आहे. जी-२० राष्ट्रांच्या निकषांनुसार आंतरराष्ट्रीय मुद्रा कोश आणि वर्ल्ड बँकेच्या निकषांना ओलांडून अधिक दरानं कर्ज घेऊ शकत नाही. हा मुद्दा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचल्यामुळेच चीननं अतिरिक्त हमीची मागणी केलीय.